Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

झाडांची होळी नको - झाडांसोबत होळी (रंग) खेळू

 


झाडांची होळी नको - झाडांसोबत होळी (रंग) खेळू


झाडांची होळी नको - झाडांसोबत होळी (रंग) खेळू*
सामाजिक सलोखा वाढावा याकरीता होळी - रंगोत्सवाची कल्पना पुर्वजांनी योजीली आहे. परंतु आज चंगळवाद प्रवृत्तीने या सणाची दिशाच बदलून टाकली आहे. माणूस आणि निसर्ग यांचे अतुट बंधन  आहे. परंतू आज होळीच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल वेळीच थांबवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड जाळणे कुठेतरी थांबायला हवे,. अन्यथा येत्या काही वर्षातच अत्यंत गंभीर परीणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत.  हे चित्र बदलायला हवे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे व वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. दुर्मीळ वनस्पतींचे रक्षण होणे गरजेचे आहे.
या विषयी समाजात जनजागृती करण्याकरीता, वृक्ष संवर्धन व्हावे या उद्देशाने
लातूर वृक्ष ग्रीन टिम ने , अंबेजोगाई रोड, लातूर च्या नवीन बसस्थानकातील एका निष्पर्ण होउन सुकलेल्या झाडाला आकर्षक रंग रंगोटी करुन त्याचे संरक्षण केले आहे. आणी
*झाडांची होळी नको - झाडांसोबत होळी (रंग) खेळू*
या होळीमध्ये लातूर जिल्ह्यात एकही लाकूड जाळायचे नाही, एकही झाड तोडायचे नाही.
हा बहुमोल संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता लातूर वृक्ष चे प्रमोद निपानीकर, मनमोहन डागा, जफर शेख, वैभव डोळे, डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, नामदेव सुब्बणवाड, सचिन क्षिरसागर, गंगाधर पवार, पुजा निचळे, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल यांनी परिश्रम घेतले. यावेळी यावेळी विक्रमी रक्तदाते पारससेठ चापशी, नगरसेविका स्वाती घोरपडे, नगरसेविका श्वेता लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली लोंढे यादव, संजय जमदाडे, विकास कातपुरे, मितेश सेठ, मीत दामा , सुहास पाटील, सिदाजी पवार, डॉ. संजीवनी कुलकर्णी, गौरव पाटील, आकाश सोमाणी, संतोष चांडक,  द्वारकादास बिदादा, रुषिकेश दरेकर हे वृक्षप्रेमी नागरीक उपस्थित होते.
*लातूर वृक्ष ग्रीन टिम चा होळी निमित्त अभिनव उपक्रम*


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post