Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरमध्ये ७ व ८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०१९... ग्रंथदिंडी,ग्रंथप्रदर्शन,परिसंवाद,कविसंमेलनाचे आयोजन

 


लातूरमध्ये  ७  व ८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०१९...
ग्रंथदिंडी,ग्रंथप्रदर्शन,परिसंवाद,कविसंमेलनाचे आयोजन


लातूर,दि.३ः महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,ग्रंथालय संचालनालय,मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,लातूरच्यावतीने  येथील डॉ.बाबासाहेब आंबेडक पार्क,टाऊन हॉल येथे दि.७ व ८ मार्च २०२० रोजी ग्रंथोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले असून, यात ग्रंथ दिंडी, ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद,कविसंमेलन आणि समारोप आदी सत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
वाचन संस्कृतीचा प्रसार आणि प्रचारासोबतच,वाचकांचा गंं्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,ग्रंथालय संचालनालय,मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,लातूरच्यावतीने  ग्रंथोत्सवाचे आयेाजन केले जाते.यंदाचा ग्रंथोत्सव २०१९ हा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन ,लातूर येथे दि.७ व ८ मार्च दरम्यान आयोजिला आहे, पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी ग्रंथदिंडी,ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्घाटन, ग्रंथोत्सव उद्घाटन, दुपारी परिसंवाद,सायंकाळी  कविसंंमेलन  असे कार्यक्रम होणार आहेत, रविवारी  सकाळी व दुपारी परिसंवाद, तर दुपारी ४ वाजता ग्रंथोत्सव २०१९ चा समारोप  होणार आहे. ग्रंथप्रदर्शन व विक्री दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत राहणार आहे. या ग्रंथोत्सवाची जोरदार तयारी सुुरु आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या अध्यतेखाली  ग्रंथोत्सव समन्वय समिती करण्यात आली असून,त्यात सदस्य सचिव म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे,  तर सदस्य म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, जिल्हा  माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.ब्रिजमोहन झंवर, प्रकाशन संघटनेचे प्रतिनिधी महारुद्र मंगनाळे, मसाप अध्यक्ष प्रा.डॉ.जयद्रथ जाधव यंाचा समावेश करण्यात आला आहे.  दरम्यान दोन दिवस चालणार्‍या या ग्रंथोत्सव २०१९ साठी लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी,ग्रंथालय सेवक,वाचक व साहित्य प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथोत्सव २०१९ समन्वय समिती ने केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post