Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवाजी महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ

 


शिवाजी महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ          


  उदगीर/प्रतिनिधि/डि के उजळंबकर


उदगीर  शिवाजी  महाविद्यालयाने 2018 -19 वर्षे 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे  सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून विविध कार्यक्रमाने साजरे केले .यानिमित्ताने विविध शैक्षणिक व गुणात्मक विकासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या महाविद्यालयाचे  अनेक विद्यार्थी अधिकारी, पदाधिकारी ,आमदार ,खासदार अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत व आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. अशा विविध क्षेत्रांमध्ये महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. या सर्वांचा गुणगौरव या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणजे दिनांक 26 फेब्रुवारी 2020 ला सकाळी ठीक 11 वाजता  सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ महाविद्यालयाने आयोजित केलेला आहे. या समारोप समारंभाचे अध्यक्ष मा.प्रा. विजयकुमार पाटील शिरोळकर अध्यक्ष कि.शि.प्र.मंडळ उदगीर तर प्रमुख पाहुणे मा .खा .रावसाहेबजी दानवे पाटील केंद्रीय राज्यमंत्री ग्राहक संरक्षण अन्न व नागरी पुरवठा भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत .तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.डाॅ. उद्धवजी भोसले कुलगुरू स्वा.रा.ती .म. विद्यापीठ नांदेड ,मा. खासदार अमरजी साबळे ,मा. खासदार सुधाकरजी श्रंगारे, मा.आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,मा. गोविंदराव केंद्रे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, माजी आमदार मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर,मा. राहुल केंद्रे अध्यक्ष जिल्हा परिषद, लातूर यांची राहणार आहे. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री .अशोकरावजी पाटील राजूरकर उपाध्यक्ष कि.शि.प्र. मंडळ उदगीर ,मा. श्री .ज्ञानदेवराव झोडगे सचिव कि.शि. प्र.मंडळ उदगीर ,मा. श्री. आर. के. देशमुख सहसचिव कि.शि. प्र.मंडळ उदगीर, मा. श्री. श्रीरंगराव पाटील एकंबेकर कोषाध्यक्ष कि.शि.प.मा. श्री. श्रीरंगराव पाटील एकंबेकर कोषाध्यक्ष कि.शि.प्र.मंडळ उदगीर, प्राचार्य डॉ .विनायकराव जाधव यांनी केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post