लातूर भाजपाला "झिरो टू हिरो' करणारे नेतृत्व आ.संभाजी पाटील निलंगेकर
लातूर,एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा जिल्हा. इथं दुसरा विचार रुजणं आणि रुजवणं अत्यंत कठीण असं काम.
जिल्ह्यातील सर्व सस्तास्थाने काँग्रेसच्या ताब्यात.अशा स्थितीत एक बियाणं स्वतःला मातीत गाडून घेत उगवून येतं आणि त्यापासून धान्याच्या राशी देतं अगदी त्याच पद्धतीने आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वतःला भाजपासाठी झोकून दिलं. पायाला भिंगरी बांधत जिल्ह्यात दौरे केले आणि भाजपाचं रोपटं वाढविण्याचं काम केलं.
ज्या जिल्ह्यात भाजपा कुठेही नव्हती त्या जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात आणून दिली. लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या,नगरपालिका आणि नगरपंचायतीही भाजपाच्या ताब्यात आल्या.लातूर महानगरपालिकेवरही भाजपाचा झेंडा फडकला.
सत्ता मिळवण्यासाठी संघटन आवश्यक असतं.ते करूनच हे साध्य करता आलं. कार्यकर्त्यांची फळी आ.संभाजी पाटील यांनी उभी केली. याच कार्यकर्त्यांनी जिल्हाभर संघटन वाढवलं. त्यापैकी काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी झाले.अनेक जण पक्षकार्यात गुंतून राहिले. विविध जाती- धर्म, समाजातील विविध घटकांना एकत्रित करत हे साध्य झालं.
सर्व समाज घटकांच्या विकासासाठी काम करण्याचं ध्येय समोर असेल तर कार्यकर्ता त्यासाठी जिवाचं रान करतो. लातूरच्या कार्यकर्त्यांना आ. संभाजी पाटील यांनी सत्तेचं स्वप्न दाखवलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं.
सत्ता मिळवणे हे एकच ध्येय नव्हते आणि कधीही असणार नाही हे कार्यकर्त्याच्या व पदाधिकाऱ्यांच्या मनावर आ. निलंगेकर यांनी ठसवलं. मिळालेली सत्ता जनतेला सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी, नागरिकांना सुखी जीवन जगता यावं यासाठी वापरायची याचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. यामुळेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरला अधिक विकासकामे झाली.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार झालं. रेल्वे बोगी कारखाना उभा राहिला. शहरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा मिळू लागल्या. लातूरचाच विचार करायचा तर अगदी शौचालयेही भाजपानेच बांधली. दुष्काळ मुक्तीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवलं.म्हणून तर जिल्ह्यातील जनता आणि मतदार भाजपच्याच पाठीशी उभा राहिला.
मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात झालं. म्हणूनच जिल्ह्यात भाजप आज "झिरो टू हिरो" झाली आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत हे सिद्धही झालं आहे. आता लातूर महानगरपालिकेतही ते दिसून येणार आहे.
Tags:
LATUR
