औसा तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित
विलासराव देशमुख पुढील कार्यासाठी दिल्या शुभेच्छा
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी औसा तालुका काँग्रेस
कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. किरण बाबळसुरे यांची निवड झाल्याबद्दल
त्यांचा यथोचित सन्मान व अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा
दिल्या.
तसेच श्री. संजय सुग्रीव लोंढे यांची औसा विधानसभा युवक काँग्रेस
अध्यक्षपदी निवड झाल्या संदर्भात त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचेही
यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी अभिनंदन केले व पुढील
कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्रीशेल्य उटगे, श्री
संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सचिन
पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, ॲड.
बाबासाहेब गायकवाड, प्रकाश मिरगे, केशव भोसले, सौ. स्वयंप्रभा पाटील,
वाघम्बर कांबळे, बाळासाहेब सांगवे, महादेव बिराजदार यांच्यासह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
---
Tags:
LATUR
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)