रेणापूरात भाजपाच्या प्रचार फेऱ्यांना मतदारांकडून
मोठा प्रतिसाद; घरोघरी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत
लातूर दि.२५- रेणापूर नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता दिवसेंदिवस रंग भरू लागला असून भाजपाच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रात प्रचार दौरे केले जात आहेत भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड आणि प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या माध्यमातून रेणा नगरीत झालेल्या विविध विकास कामामुळे भाजपाच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले जात आहे.
भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती शोभा शाम आकनगिरे यांनी मंगळवारी दि. २५ सकाळी शहरातील बालाजी मंदिर परिसर, सुतार गल्ली, गाडे गल्ली,महादेव मंदिर परिसर, धनगर गल्ली, साठेनगर, बौद्ध नगर, एकुरके गल्ली तसेच बसवेश्वर चौक ते नगरपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वसाहत, संभाजी नगर या परिसरात घरोघर जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या,त्यांचे आशीर्वाद घेतले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती शोभा आकनगिरे यांच्या समवेत भाजपाचे उमेदवार अच्युत कातळे, धम्मानंद घोडके, सौ. धरती महेश गाडे, दत्ता सरवदे यांच्यासह सौ. खैरूनिसा आतार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
श्रीमती शोभाताई आकनगिरे व सर्व उमेदवारांनी मतदारांच्या घरी भेटी दिल्या. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिलांनी उमेदवारांना औक्षवण केले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपाच्या ताब्यात नगरपंचायत असल्याने आपल्याला या योजनांचा लाभ मिळू शकला, हे उमेदवारांना समक्ष भेटून सांगितले. यावेळीही आम्ही भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली.
या प्रचार दौऱ्यांना मतदारांसह महिला आणि तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शेकडोंच्या संख्येने महिला, तरुण रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे जनतेच्या मनातील उमेदवार दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.अनेक प्रभागात नागरिकांनी दारांसमोर रांगोळ्या काढून प्रचारफेरीचे स्वागत केले.
Tags:
LATUR
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)