रामतीर्थवाडी येथे श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा - २५वे रौप्य महोत्सव
संगीतमय श्रीमद्भागवत कथा सप्ताह - वैभवजी महाराज जगताप यांचे कीर्तन
भालकी: दि. २६ तालुक्यातील रामतीर्थवाडी येथे ह.भ.प. स्व. काशीराम महाराज बिरादार यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने, परंपरेनुसार आणि सालाबादाप्रमाणे तसेच वारसा हक्काने श्री कृष्णाजी दिगंबर बिरादार यांच्या संयोजनातून यावर्षी २५वा श्री गुरुदेव दत्त जयंती रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावात साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्ताने संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. मंगलताई बिरादार (आळंदी देवाची) यांच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज दुपारी दोन ते पाच दरम्यान कथा पार पडणार आहे.
कथाव्यास म्हणून श्री भागवताचार्य वैभवजी महाराज जगताप पांडे पोखरीकर (जालना) यांचे आगमन होणार आहे. कार्यक्रमाचे सिंथवादन श्री माऊली महाराज कदम, तबलावादन गजानन महाराज नांदेडकर, सहगायन प्रशांत महाराज वैजापूरकर तसेच रामतीर्थवाडी भजन मंडळ आपले सादरीकरण करणार आहेत. या धार्मिक सोहळ्याला एन.के.टी. चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला ठाणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदरील कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. कृष्णाजी दिगंबर बिरादार, सौ. सरोजना कृष्णाजी बिरादार, तानाजी बिरादार, नेताजी बिरादार, सुशांत बिरादार, विठ्ठल महाराज राजपूत, नवनाथ महाराज लंगोटे, सतीश महाराज बिरादार, मीराताई गिरी येणकीकर, राहुल बिरादार यांनी सर्व भक्तांना उपस्थित राहून श्री चरणी आत्मिक आनंद घेण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख अशोक गुरनाळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Tags:
Bhalki
.jpg)
.jpg)