🚨 *सावधान: राष्ट्रीय महामार्ग ५२ (बीड ते तुळजापूर) ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ ,प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा*🚨
बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे. खालील धोकादायक ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
📍 *धोकादायक ठिकाणे (Hotspots):*
या १० ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे:
१. *मांजरसुंबा घाट (बीड)*
२. *चौसाळा बायपास*
३. *पारगाव बायपास*
४. *सरमकुंडी फाटा*
५. *इंदापूर फाटा*
६. *पार्डी फाटा*
७. *घुले माळ जवळील उड्डाणपूल*
८. *तेरखेडा ते येडशी टोल नाका*
९. *येडशी बायपास*
१०. *धाराशिव ते तुळजापूर*
⚠️ *चोरट्यांची लुटमार करण्याची कार्यपद्धती (Modus Operandi):*
गुन्हेगार प्रामुख्याने खालील प्रकारे लुटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे:
*कृत्रिम अपघात* :महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक (Jack) किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे व मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे.
शस्त्रांचा धाक: वाहन अडवून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे.
*दुचाकीस्वारांना लक्ष करणे:* धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे. तसेच पाठलाग करून 'चैन स्नॅचिंग' करणे.
*जनावरे रस्त्यावर सोडने *
रस्त्यावर जनावरे सोडून वाहनाची गती कमी करून त्यानंतर रोडच्या बाजूला दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करून मारहाण करून लूट करणे.
*कृत्रिम गतीरोधक तयार करुन*
ठिबक चे पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे.
*ईंधनचोरी:* रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे.
*दुभाजकाचा (Divider) वापर:* दुभाजकामध्ये असलेल्या झाडा झुडपात लपून बसणे आणि वाहनावर हल्ला करणे.
🛡️ *नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना (Advisory):*
१. *थांबू नका:*
वर नमूद केलेल्या १० धोकादायक ठिकाणी आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे टाळा.
२. *समूहाने प्रवास करा:*
रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकटे जाणे टाळा. शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने (Convoy) प्रवास करा.
३. *दुभाजकापासून अंतर ठेवा:*
वाहन चालवताना दुभाजकाला (Divider) एकदम खेटून चालवू नका, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात.
४. *संशयास्पद हालचाली:*
रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, वेगात पुढे निघून जा.
५. *मदत कोठे मागाल?:*
काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा धाबा यासारख्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या.
👮 पोलीस मदत आणि संपर्क क्रमांक:
पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके (७ वाहने) तैनात केली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 डायल ११२ (Dial 112) - तात्काळ मदतीसाठी
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे (पो. ठाणे वाशी): 93551 00100
सपोनि (API) गोसावी (पो. ठाणे नेकनूर): 90090 08070
सपोनि (API) भालेराव (पो. ठाणे येरमाळा)
9404335333
सपोनि (API) निशीकांत शिंदे (महामार्ग सुरक्षा)
9850090833
*टीप:* हा संदेश जनहितार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सुरक्षित प्रवास करा.
Tags:
Ahmadpur
BEED
Bhalki
Breaking
Ch.Sambhajinagar
Corona News
Crime News
HYDERABAD
JALNA
LATUR
LEKH
MUMBAI
PUNE
SAMBHJI NAGAR
Social News
SOLAPUR
Tuljapur
