पोलीस अधिक्षक, लातूर यांच्या संकल्पनेतुन "पोलीस-विद्यार्थी संवाद" कार्यक्रमाचे दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजन
याबाबत अधिक माहीती अशी की, श्री. अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, लातूर यांच्या संकल्पनेतुन लातूर जिल्हयामध्ये पोलीस-विद्यार्थी संवाद चे आयोजन करण्यात येत आहे. आजपावेतो लातूर शहरात एकून १६ शाळा-महाविदयालयांना भेटी देवून पोलीस-विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आगामी काळात जिल्हयातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी लातूर जिल्हा पोलीस, दयानंद शिक्षण संस्था, लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "पोलीस-विद्यार्थी संवाद" कार्यक्रमाचे आयोजन दयानंद सभागृहात करण्यात आलेले होते. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक श्री. समोरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना विविध कायद्याबद्दल माहिती दिली. तसेच विविध कायदे, बालगुन्हेगारी, अंमली पदार्थ व सायबर सुरक्षा याबद्दलही जनजागृती केली. तसेच महाविद्यालय परिसरामध्ये होणाऱ्या गुन्हयांसाठी कायद्यांमध्ये असणाऱ्या तरतुदी, लैंगिक अत्याचारासंबंधी होणारे गुन्हे व त्याची शिक्षा याबद्दल विद्याथ्यांना चित्रफित व PPT च्या स्वरूपात माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थीनीसाठी पोलीस विभागातर्फ असणाऱ्या विविध सुविधा, हेल्पलाइन नंबर ११२, १०९८, दामिनी पथक यासंबंधीही माहिती देण्यात आली. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विद्याथ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून कसे लांब राहिले पाहिजे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी महाविद्यालयीन विद्याथ्यांनी शिस्तीचे व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका डॉ. संध्या वाडीकर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम मा.श्री. अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, लातूर यांचे संकल्पनेतुन श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर, श्री. समाधान चवरे, पोलीस निरीक्षक पोस्टे एमआयडीसी पोअं. योगेश पिसदुरकर व दयानंद शिक्षण संस्था, दयानंद विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजीत करण्यात आला.
Tags:
LATUR
