सेल्फी विथ रिसीप्ट* चे मनपाकडून आयोजन
• दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष कर वसुली शिबिराचे आयोजन
• फक्त एक दिवसासाठी- शास्तीत ८०% सुटची संधी
• १ डिसेंबर पासून सुरू होणार धडक जप्ती मोहीम
कर संकलन व कर आकारणी विभाग मार्फत १ डिसेंबर पासून धडक जप्ती/अटकावणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी थकबाकीदार याना टॅक्स भरण्याची संधी मिळावी या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त(कर संकलन) डॉ पंजाब खानसोळे यांच्या नियोजनातून दि ३० नोव्हेंबर रोजी सेल्फी विथ रिसीप्ट- विशेष कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात थकीत टैक्स भरणारे मालमत्ता धारकांसाठी मालमत्ता करात ८०% शास्ती माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी दि.३० नोव्हेंबर २०२५ रविवारी सकाळी १० ते ५ या वेळात महानगरपालिका मुख्यालय येथे शिबिरात सहभागी होवून थकबाकीदार मालमत्ता धारकानी सूट चा लाभ घेवून आपला थकीत टॅक्स भरून शहराच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे .
या शिबिरापूर्वी ४००० थकबाकीदार मालमत्ता धारकाना नोटीस बजावण्यात आली असून या शिबिरासाठी देण्यात येणारी ८०% शास्ती माफी ही या वर्षातील शेवटची शास्ती माफी योजना असल्याने व १ डिसेंबर पासून सुरू होणारी जप्ती सारखी कटू कार्यवाही टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान मनपा उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
Tags:
LATUR
