मनसे विद्यार्थी सेनेच्या लढ्याला यश
श्री चैतन्य टेकनो स्कूल वर पालकाची व शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल
महाराष्ट्र्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गेल्या दीड वर्षांपासून लातूर मधील अनधिकृत शाळेविरोधात आवाज उठवला होता शासनाची कोणतीही परवानगी न घेता शाळा पालकाची फसवणूक करून लाखो रुपयाची फिस वसूल करत होते हे मनविसे च्या लक्षात आल्यावर शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करत दिनांक 21/ 7/25 रोजी शाळेला सिल लावून RTE act 2009 नुसार प्रथम दिवशी 1लाख आणि पुढील दर दिवशी 10 हजार प्रमाणे 7 लाखाचा दंड आकारण्यात आला होता ते दंड न शाळा प्रशासन ने शाळा चालूच ठेवली यानंतर मनविसे ने शाळेसमोर निदर्शने करून संताप व्यक्त केला तरी देखील शाळा चालू ठेवली दीपावली सुट्ट्या नंन्तर शाळा प्रशासन ने सिल लावलेले तोडून मध्ये परीक्षा घेत असल्याचे मनसे च्या निदर्शनास आल्या नंतर याची तात्काळ माहिती शिक्षण विभागास कळविले तात्काळ 19 नोंव्हेबर रोजी गटशिक्षण अधिकारी यांनी कर्मचारी पाठवून तपासणी केली असता सील तोडून शाळा चालू असल्याचे निदर्शनास आले त्यांनी पंचनामा करून वरिष्ठाकडे अहवाल पाठवला शिक्षणाधिकारी मठपती साहेबानी तात्काळ दिनांक 25 नोव्हेबर रोजी पोलीस स्टेशन ला पत्र काढून गुन्हा नोंद करा असे आदेश दिल्यानंतर काल दिनांक 27 नोंव्हेबर रोजी पालकाची व शासनाची फसवून केल्याचा श्री चैतन्य टेक्नो स्कूल याच्या मुख्याध्यापक व संचालक यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

