Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'स्वार्थी महायुतीला बाजूला करा'; अहमदपूरच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करा: आमदार अमित देशमुख यांचे आवाहन

'स्वार्थी महायुतीला बाजूला करा'; अहमदपूरच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करा: आमदार अमित देशमुख यांचे आवाहन









राज्याच्या तिजोरीची मालक जनता असून संविधानाने दिलेला हक्क 
कोणीही हिरावून घेऊ शकत नाही
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सरकारवर घणाघात

लातूर प्रतिनिधी : गुरूवार, २७ नोव्हेंबर २०२५:
सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधायचा असेल, तर या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी करुन लातुर प्रमाणे अहमदपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी  नगरपरिषदेत आपण प्रचंड मतांनी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांना विजयी करून पाठवावे व अहमदपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प करावा असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. अहमदपूर नगरपरिषद निवडणूक निमित्ताने महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी अहमदपूर शहरात महाविकास आघाडीची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी भव्य प्रचार सभा संपन्न झाली. प्रारंभी २६/११ हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी, आमदार अमित विलासराव देशमुख आणि मान्यवरांनी संविधान दिनानिमित्त अहमदपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व संविधान उद्देशिकेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या सभेला खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री विनायकराव पाटील, नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) चे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, व्हा.चेअरमन विजय देशमुख, एन. आर.पाटील, काँग्रेसचे अहमदपूरचे निरीक्षक प्रमोद जाधव, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद जाधव, चंद्रकांत मद्दे, माधवराव जाधव, सोमेश्वर कदम, भारत सांगवीकर, राम बेल्लाळे, जरानखान पठाण, निलेश देशमुख, सिराज जहागीरदार, सांब महाजन, दत्ता हेंगणे, विकास महाजन, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आदिसह काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणुकीत उतरली असून, सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शेख कलीमोद्दीन अहमद हकीम आणि २५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा कोर्ट रोड परिसरातील हॉटेल साई प्रीतम समोर पार पडली.
महायुती स्वार्थी, महाविकास आघाडी एकसंघ: 
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी महायुतीवर टीका केली. ते म्हणाले, "राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या स्वार्थी राजकीय पक्षांची महायुती अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत टिकलेली नाही, याउलट सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी महाविकास आघाडी मात्र एकसंघ राहून भक्कमपणे उतरली आहे. या निवडणूकीत सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळख असलेले माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील या आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.
पूर्वी मुख्यमंत्री असताना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी विनायकराव पाटील यांच्यामार्फत अनेक सिंचन प्रकल्प बांधले आणि शहर विकासाच्या योजना राबवल्या. मात्र आज प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीची सत्ता असलेल्या नगर परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, अशी आमदार देशमुख यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले, अहमदपूरचा विकास करण्यासाठी, शैक्षणिक वातावरण, व्यापारी संकुल, बाग-बगीचे, नियमित पाणीपुरवठा, कचरा आणि दिवाबत्तीचे व्यवस्थापन तसेच आरोग्य सुविधा उभारण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल या चिन्हांसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे महाविकास आघाडीला 
शहराचा विकास करण्याची संधी द्यावी - खासदार डॉ. शिवाजी काळगे
यावेळी बोलताना खा. डॉ.शिवाजी काळगे म्हणाले की, अहमदपूर नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी प्रचंड धनशक्तीचा वापर करत आहेत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.महाविकास आघाडीला शहराचा विकास करण्याची संधी आपण द्यावी. महाविकास आघाडीचे अहमदपूर नगरपरिषदमधील नेते एक संघपणे निवडणूक लढवत आहेत मतदार बंधू भगिनींनी आपल्या अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या समोर असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले.



आमचे उमेदवार नवरत्न, सर्वसामान्य कुटुंबातील
सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी 
एक रुपयाचाही निधी आणलेला नाही
माजी मंत्री विनायकराव पाटील
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, अहमदपूर शहराचा काही विकास केला नाही म्हणून सध्या सहकार मंत्री गल्लीबोळात प्रचार करत फिरत आहेत ते सामान्य माणसाची दिशाभूल करत आहेत. आमचे  उमेदवार नवरत्न असून ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
सत्ताधाऱ्यांनी केलेला अहमदपूर शहरातील रस्ता सहा महिने टिकत नाही, अहमदपूर शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी एक रुपयाचाही निधी आणलेला नाही, विकास कामातील मलिदा फक्त ते खातात, कचऱ्या चे साम्राज्य शहरात वाढले आहे, अशी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका त्यांनी केली. शेवटी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले. तर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी, "गेल्या १५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी केलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. या विकासाला निधी कमी पडू देणार नाही," असा विश्वास दिला.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले की, अहमदपूर नगरपालिकेचा ३ तारखेचा गुलाल हा आपला आहे. गेल्या १५ वर्षात सत्ताधाऱ्यानि अहमदपूरच्या विकास काहीही केला नाही तो विकासाचा बॅकलॉग आपणाला भरून काढायचा आहे. यासाठी विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना  प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी बोलताना केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी म्हणाले की,अहमदपूर शहरात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे नगरपरिषदेत भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झाला आहे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना, हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
---

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post