एमईएच्या वतीने व्यावसायिक व उद्योजकांचा आज मेळावा
विविध मान्यवरांची उपस्थिती : व्यवसाय वाढीसंदर्भात होणार मार्गदर्शन
लातूर/प्रतिनिधी : मराठा समाजातील व्यावसायिक व उद्योजकांच्या हितासाठी काम करणाºया मराठा इंटरप्रिनियर्स असोसिएशन (एमईए)च्या वतीने लातूर जिल्ह्यातील व्यावसायिक व उद्योजकांचा मेळावा आज दि. १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात व्यवसाय व उद्योग विस्ताराच्या संधीवर मार्गदर्शन होणार असून या मेळाव्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थितीत राहणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील मराठा समाजातील व्यावसायिक व उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एमईएच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतात व्यवसाय व उद्योगाच्या विविध संधी समोर येत आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने भारताची वाटचालसुरु असून यामध्ये व्यावसायिक व उद्योजकांचा मोठा हातभार आहे. त्यामुळेच मराठा समाजातील व्यावसायिक व उद्योजकांच्या हितासाठी महाराष्ट्रात मराठा इंटरप्रिनियर्स असोसिएशन दहा वर्ष पासून कार्यरत आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभरातील मराठा समाजातील व्यावसायिक व उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे आज दि. १ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील मराठा समाजातील व्यावसायिक व उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. विक्रम काळे, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. धिरज देशमुख यांच्यासह नॅचरल शुगरचे चेअरमन बी.व्ही. ठोंबरे व प्रसिध्द वास्तू विशारद गोपाळ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. हा मेळावा औसा रोडवरील छत्रपती चौक, वाडा हॉटेल येथे दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे.
या मेळाव्यात व्यावसायिक व उद्योजकांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार असून आपला व्यवसाय व उद्योग वाढविण्यासाठी वेगवेगळ्या संधीबाबत विस्तृत चर्चा होणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील व्यावसायिक व उद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एमईएचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, संजय शिंदे, विक्रम नरसाळे, सिद्राम साठे यांनी केले आहे.
Tags:
LATUR
