Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रेणापूर नगरपंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

रेणापूर नगरपंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

रेणापूर नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा केला निर्धार




रेणापूर :-- रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनी रेणापूर तहसील कार्यालयात एकत्रित जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका मातेचे व त्यानंतर महेबुब सुभानी दर्गा येथे दर्शन घेवुन रेणापूर नगरपंचायतीसाठी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख साहेब,माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पुर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ व पारदर्शक कारभार करून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले असून यासाठी जनतेच्या मनातील चांगले उमेदवार दिले आहेत. विकासाभिमुख व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 

यावेळी माजी जि . प . अध्यक्ष संतोष देशमुख , मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तथा निरीक्षक सचिन पाटील , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे ,
कृउबा समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे , उपसभापती ॲड . शेषेराव हाके ,
कृउबाचे माजी सभापती रमेश सुर्यवंशी , पं स माजी उपसभापती श्रीनिवास आकनगिरे , माजी सभापती बाळकृष्ण माने , शहराध्यक्ष पदमसिंह पाटील , माजी सरपंच अशोकराव राजे ,कृउबाचे संचालक हनंतराव पवार , अशोक राठोड ,ॲड शिरीष यादव , मुरलीधर पडोळे , प्रकाश सुर्यवंशी , जनार्धन माने , महेश खाडप , गजेंद्र चव्हाण ,महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा इगे,शहराध्यक्षा निर्मला गायकवाड ,रेणाचे संचालक धनराज देशमुख, बालाजी हाके , बाळासाहेब करमुडे, विजयकुमार एकुरके, मुकेश राजे,विजय काळे, मनोहर व्यवहारे यांच्यासह एकूण १७ प्रभागातील निरीक्षक व नगरराध्यक्ष पदाचे उमेदवार माने अर्चना प्रदीप (राजू), नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्र.१ सर्वसाधारण - काळे प्रदीप सुधाकर, प्रभाग क्र.२ सर्व साधारण महिला - राठोड कांताबाई हिरामण, प्रभाग क्र. ३ सर्व साधारण महिला - अकनगिरे पुजा सावंत, प्रभाग क्र. ४ अनुसूचित जाती - चक्रे अजयकुमार भिवा, प्रभाग क्र. ५ ना.मा.प्रवर्ग - भोकरे गोविंद प्रभू, प्रभाग क्र. ६ ना.मा.प्रवर्ग महिला - कातळे शीतल अतुल (अश्विनी), प्रभाग क्र. ७ सर्वसाधारण - मोटेगावकर सचिन अनुरथ, प्रभाग क्र. ८ सर्वसाधारण महिला - शिंदे राजश्री संतोष, प्रभाग क्र. ९ सर्वसाधारण महिला - पठाण यास्‍मीन रहिमखॉ, प्रभाग क्र. १० - सर्वसाधारण महिला - शेख रजियाबी पाशामियॉ, प्रभाग क्र. ११ - ना.मा.प्रवर्ग महिला - इगे इंदुबाई पुंडलिक, प्रभाग क्र. १२ ना.मा.प्रवर्ग - पनुरे मिनाक्षी भूषण, प्रभाग क्र. १३ सर्वसाधारण -- चव्‍हाण गजेंद्र मनोहर, प्रभाग क्र. १४ ना.मा.प्रवर्ग महिला - राठोड पुजा विलास, प्रभाग क्र. १५ अनुसूचित जाती महिला - सौदागर (कलाल) सुजाता बाबू , प्रभाग क्र. १६ सर्वसाधारण - कोल्‍हे संतोष तुकाराम, प्रभाग क्र. १७ सर्वसाधारण - थावरे गणेश श्रीमंत व रेणापूर तालुक्यातील आजी माजी सरपंच,युवक काँग्रेस, विलासराव देशमुख युवा मंच यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post