डॉक्टरांकडून खंडणी मागणाऱ्या ७ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल – ३ आरोपी अटकेत.
फिर्यादी डॉ. रमेश तुकाराम भराटे (वय ५२ वर्षे), गायत्री हॉस्पिटल, बार्शी रोड, लातूर यांच्या तक्रारीवरून डॉक्टरांकडून जबरदस्तीने खंडणी मागणे, हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर घुसखोरी, स्टाफवर मारहाण, धमक्या देणे, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर प्रकारात ०४ पुरुष व ०३ महिला आरोपींविरुद्ध गु.र.न. ८४०/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८/११/२०२५ रोजी सायंकाळी फिर्यादी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ ला पगार देण्याचं कारणावरून वादाचे निमित्त करून नमूद आरोपीनी हॉस्पिटल मध्ये जमाव जमवून आरोपींनी गायत्री हॉस्पिटलच्या परिसरात अनधिकृत प्रवेश करून, रुग्णालयातील शांत वातावरणामध्ये भीती निर्माण होत राहील असा गोंधळ व जमाव जमवला. डॉक्टर व नर्स स्टाफला दमदाटी व मारहाण करून डॉक्टर भराटे यांना लक्ष्य करून धमक्या, आरडाओरडा, शिवीगाळ केली.
तसेच रुग्णालयातील नर्सिंग स्टाफला ढकलणे, मारहाण करणे अशा हिंसक कृती केल्या. सदर घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच टायगर ग्रुप चा जिल्हाध्यक्ष आहे असे म्हणणारे आरोपींनी भागवत वैजनाथ मडके याने डॉक्टरांकडून रु. ५०,०००/- खंडणीची मागणी केली.
डॉक्टरांनी दबावाखाली केलेल्या व्यवहारातून आरोपींनी रु. १०,०००/- ची रक्कम ऑनलाइन स्वीकारली, जी पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहे.
महिला आरोपींनी डॉक्टरांना विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना महिला आरोपी राधिका विराज पाटील उर्फ नगीता विरभद्र खरोसे हिने तक्रारदारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या, दबाव तंत्र निर्माण करत गोंधळ घातला.
महिला पोलिसांनी तिला ठाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिने हुज्जतबाजी, आरडाओरडा व अरेरावी केली.
खालील नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 333, 308(2), 189(2), 190, 191(2), 191(3), 115, 352, 351(2) – भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ५ – महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) अधिनियम २०१० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून वर उल्लेखित सर्व कलमे अत्यंत गंभीर असून, डॉक्टर व वैद्यकीय संस्थांवरील कोणत्याही प्रकारच्या दडपशाही व हिंसक कृत्याविरुद्ध कडक कारवाईचे प्रावधान यात आहे..
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये
1.भागवत वैजनाथ मडके, रा. चिखली
2.अभिषेक दशरथ गिरी, रा. कोकाटे नगर, लातूर
3.ओम मेगशेट्टे
4.आकाश मोठे
5.पूनम गुंडाळे
6.राधिका विराज पाटील उर्फ नगीता विरभद्र खरोसे
7.काजल जाधव
यांचा समावेश असून एमआयडीसी पोलिसांनी प्रमुख आरोपींपैकी
1.भागवत वैजनाथ मडके,
2.अभिषेक दशरथ गिरी,
3.राधिका पाटील उर्फ नगीता खरोसे
या तिघांना अटक केली आहे. इतर सर्व आरोपींवर पोलिसांचे विशेष पथके शोध मोहीम राबवत आहेत.
आज रोजी तिन्ही अटक आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने ०३ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि श्रीकांत मोरे, एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर यांच्याकडे असून ते तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष यांच्या आधारे करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन.
लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करतात की—
खंडणी, बेकायदेशीर दबाव, डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे, रुग्णालयातील शांतता भंग करणे अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कुणी करत असल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवा. पोलिस विभाग अशा गुन्ह्यांवर कडक व कायदेशीर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे.
Latur Police Department
Tags:
LATUR