Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपा सरचिटणीस श्री दिग्विजय काथवटे यांच्या उपस्थितित २१ ब्राम्हणांच्या हस्ते श्री रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला.

भाजपा सरचिटणीस श्री दिग्विजय काथवटे यांच्या उपस्थितित २१ ब्राम्हणांच्या हस्ते श्री रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला.








 लातूर दि.२२- प्रदिर्घ संघर्षानंतर आयोध्‍या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्‍य मंदिर उभारले असून या मंदिरात २२ जानेवारी सोमवार रोजी प्राणप्रतिष्‍ठापणा झाली.आयोध्‍येत श्रीरामाचे भव्‍य दिव्‍य मंदिर होणे आणि त्‍या मंदिरात मुर्तीची प्रतिष्‍ठापणा होणे हा क्षण स्‍वर्णअक्षरांनी लिहला जाणारा आहे. या निमित्‍ताने संपुर्ण देशभर मोठा आनंदोत्‍सव साजरा केला जात आहे. जगाचे नेतृत्‍व करण्‍याची क्षमता असणारे कणखर, विकसनशील नरेंद्रजी मोदी यांच्‍या रुपाने देशाला नेतृत्‍व मिळाले. या नेतृत्‍वाचा परिणाम आज देश आनंदाचा क्षण साजरा करीत आहे. जुने गुळ मार्केट या ठिकाणी भाजपा सरचिटणीस श्री दिग्विजय काथवटे यांच्या उपस्थितित २१ ब्राम्हणांच्या हस्ते श्री रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात भाजपा सरचिटणीस श्री दिग्विजय काथवटे,गौरव काथवटे व त्यांचे कुटुंबिय 
तसेच शहर जिलाध्यक्ष देवीदास काळे,मंडळ अध्यक्ष प्रमोद गुडे,भाविक भक्‍त, आणि परिसरातील महिला पुरुष, भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post