Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपा कार्यकर्ते सुनील सिरसाट यांची नरेंद्र मोदी विचारमंच बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड

भाजपा कार्यकर्ते सुनील सिरसाट यांची नरेंद्र मोदी विचारमंच बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड



(अंबाजोगाई:- प्रतिनिधी)-- भारतीय जनता पार्टीचे आणि हिंदुत्ववादी विचाराचे कट्टर कार्यकर्ते म्हणून संपूर्ण मराठवाड्यात परिचित असणाऱ्या सुनिल सिरसाट यांची नुकतीच देश-विदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पोहोचण्याकरता स्थापित केलेल्या नरेंद्र मोदी विचार मंचाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आंबेजोगाई येथील असलेले सर्वांच्या परिचयाचे आणि समाजात लोकप्रिय सामाजिक-राजकीय कार्यकर्ते म्हणूनही आणि एक निर्भीड पत्रकार, रोखठोक व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची बीड जिल्ह्यासह संबंध मराठवाड्यात एक वेगळी ओळख आहे. ते गेल्या 28-30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे आणि स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. शिवाय विद्यमान कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे मुंडे हे भाजपावाशी असतानाचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून जिल्हाभरात परिचित होते. याशिवाय त्यांनी मागील वीस वर्षात भाजयुमोच्या अंबाजोगाई कार्यकारणीत उपाध्यक्ष,सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी पार पडलेली आहे. विशेष म्हणजे सध्याला त्यांच्याकडे भाजपाच्या पंचायतराज व ग्रामविकास समितीच्या मराठवाडा विभागाच्या सह-संयोजक पदाची आणि अखंड हिंदूराष्ट्र संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदाची तिसऱ्यांदा जबाबदारी असतानाही पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकून नव्याने नरेंद्र मोदी विचारमंचाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातील हिंदू संघटना, बजरंग दल, अभाविप, विश्व हिंदू परिषद, व्यापारी, कार्यकर्ते, इतर विविध संघटना, भाजप-दोन्ही शिवसेने सह ईतर पक्षातील पुढारी-पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार बांधव, वकील संघासह मित्र परिवाराकडून स्वागत-अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छाही दिल्या जात आहेत....!

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post