Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान !

हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान !

‘हलाल’ उत्पादनांच्या सक्तीविरोधात सोलापूर येथे आंदोलन !




 सोलापूर - गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या त्यांच्या आऊटलेटमध्ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकत आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी उपस्थित केला. हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सोलापूरातील जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या समोर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. 

    या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ढगे, श्रीराम युवा संघटनेचे श्री. अर्जुनसिंग शिवसिंगवाले, हिंदुत्वनिष्ठ सुरज मदनावाले, धर्मप्रेमी श्री. ऋतुराज अरसिद यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला उद्योजक शिवराज पडशेट्टी, यशपाल चितापुरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तत्रय पिसे, बालराज दोंतुल, संदीप ढगे, रमेश पांढरे, सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले. 

 या प्रसंगी श्री. विक्रम घोडके पुढे म्हणाले की, ‘मॅकडोनाल्ड्स’, ‘के.एफ्.सी’, ‘पिझ्झा हट’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची फूड आऊटलेट १०० टक्के ‘हलाल प्रमाणित’ आहेत, असे घोषित केले आहे. ‘पिझ्झा हट’मध्ये जाणार्‍या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार बनवण्यात आलेले ‘हलाल’ पदार्थ देणे, हा हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती खपवून घेणार नाही. याबरोबरच हिमालया, नेस्ले यांसारख्या अनेक कंपन्यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करावी, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत. या वेळी ‘हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रद्द करा !’ या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. 


श्री. राजन बुणगे,
समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सोलापूर 
संपर्क क्र. : 9762721304

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post