गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गुटखा चोरी प्रकरण ...
गुटख्याचा जप्त मुद्देमाल चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा, आरोपी निष्पन्न ...
.काही आरोपी चौकशीच्या फेऱ्यात, लवकरच होणार अटक
लातूर- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 10/10/2021 रोजी अन्नसुरक्षा अधिकार्याचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 635/2021 कलम 272, 273 ,328, 34 भादवि,अन्नसुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात 84 लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटका जप्त करण्यात आला होता.
पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे जप्त मुद्देमाल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे त्याच ठिकाणी सदरचा मुद्देमाल गोडाऊनला सीलबंद करून ठेवण्यात आला होता.
त्या मुद्देमालाची विल्हेवाट/ नाश करण्याचे मा.न्यायालयाचे आदेश झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी अंमलदार व अन्नसुरक्षा अधिकारी तसेच महानगरपालिका चे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गोडाऊन उघडले असता त्या गोडाऊन मध्ये जप्त केलेल्या मुद्देमाल यापैकी काही मुद्देमाल कमी असल्याचे निदर्शनास आले. पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची तुलाना सध्या उपलब्ध असलेल्या मुद्देमालाशी केली असता विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू व पानमसाला असा मिळून एकूण 40 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल गोडाऊनच्या एका कोपऱ्यातील पत्रा उचकटून आज प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 36/2022 कलम 454, 457, 380, 34, 328 भादवि प्रमाणे दिनांक 21/01/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा छडा लावण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. सदर पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारावर इसम नामे
1) राहुल भगवंत कांबळे,राहणार महादेव नगर लातूर
2) अजित विकास घोलप, राहणार घोलपवाडी पुणे
3) इस्माईल मधुकर कदम, राहणार सिद्धात सोसायटी लातूर
4) समाधान परमेश्वर कांबळे, राहणार खोरी गल्ली लातूर.
5)खमरउनिसा युनुस निळकंठ, राहणार एमआयडीसी लातूर
6)नमा युनुस निळकंठे राहणार एमआयडीसी लातूर
7) रंजना भगवान कांबळे, राहणार महादेव नगर लातूर
8)महेश विकास बनसोडे, राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर
9) किरण बाई गाताडे ,राहणार महादेव नगर लातूर
10) उमेश जाधव, राहणार पंढरपूर
11) बाळकृष्ण रामचंद्र गणे, राहणार वसवाडी लातूर
12) खादर शेख, राहणार चाकुर
13) अहमदपूर येथील एक दुकानदार
अशा लोकांनी आपसात संगनमत करून वर नमूद जप्त मुद्देमाल यापैकी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले .नमूद आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक श्री संजीवन मिरकले हे करीत आहेत.