Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! विशाल नगर परिसरात विद्यार्थावर कोयत्याने वार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
विशाल नगर परिसरात विद्यार्थावर कोयत्याने वार 
 

                          लातूर दि.२३जानेवारी रोजी भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या , रहदारीचा भाग असलेल्या साई मंदिरा शेजारच्या चौकात एका विद्यार्थावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले केल्याची खळबळजनक घटना घडली असुन. घटना घडताच काही मिनिटांतच पोलिस घटना स्थळी पोहचले.तरूण गंभीर जखमी असून.हल्ला कोणी केला, का? केला याचे कारण अद्याप कळले नसून पुढील तपास पोलिस करत आहेत.
लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस भांडणे,मारामार्यांचे प्रमाण वाढत चालले असून,छोट्या छोट्या गोष्टीवरून तरुणांमध्ये जिवघेण्यापर्यंत मजल जात आहे.सध्या शहराची खुपच वाईट परिस्थिति असुन,अवैध धंदे,उघड पणे चालू असलेला गुटखा बाजार आणि चालू असलेल्या मटक्याला मिळणारे काही पोलिसांचे साटेलोटे त्यातच आता ह्या विद्यार्थ्यांवर झालेला खुनी हल्ला  त्यामुळे शहर सध्या गुन्हेगारी प्रवृति च्या विळख्यात अडकले असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे साहेबांचा वचक अशा प्रवृत्तीवर कमी होत चालला असून वेळीच लक्ष देणे अवश्यक बनले आहे.दोन दिवसापुर्वी जप्त केलेला गुटखा चक्क १२ते१५लोकांनी मिळून चोरी केल्याचे पोलिस म्हणत असले तरी,हा एक प्रकारे १करोड रुपयाच्या मुद्देमालावर दरोडा असल्याची चर्चा लातूर मध्ये होवू ला गली आहे. त्यातील काहि लोकांना शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले खरे परंतू  मुद्देमाल  रिकव्हरी प्रमाण नगन्य दिसत आहे.  अशा घटनेवर पोलिस अधिक्षक यांनी जनतेसमोर त्यासंबंधी माहिती देणे अपेक्षीत असताना मात्र तसे होताना दिसत नाही किंबहुना आरोपी पकडल्यामुळे त्यांना  घटनेनेचे गांभीर्य कमी वाटले असावे.आशा घटना वारंवार होवू नये यासाठी अवैध धंद्यावर आवर घालणे हा एक मात्र उपाय असल्याचे बोलले जात आहे.


Previous Post Next Post