गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शहरातील विविध ठिकाणी मटक्यावर धाडी.
मटका किंग "गुरुजी"केव्हा येणार पोलिसांच्या जाळ्यात.!
पोलिसांच्या डोळयावर मटकाकिंग "गुरुजी"ची पट्टी..?
| प्रतिकात्मक फोटो |
लातूर-
पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या चालणारा मटका, जुगार अचानक पणे कमी झाला आणि सर्वसामान्य जनतेने एकच श्वास सोडला .मात्र काही महिन्यापासून रोडवर बसुन चिठ्ठया घेऊन मटका चालू असल्याचे चित्र दिसत आहेत. यावर उघडपणे त्यांना हप्ते देऊन चालू असल्याचे बोलले जात आहे.पोलीस अधीक्षक यांच्या कानावर ह्या गोष्टी येताच त्यांनी अवैध धंद्यावर लगाम घालण्यासाठी कारवाईचे आदेश दिले खरे परंतू सध्या मटका किंग "गुरुजी" सोडून पोलिसांचे संपुर्ण लक्ष पूर्व भागात केंद्रित झाले आहे.त्याभागात धाडी मारण्यास सुरुवात केली .पंधरा दिवसापूर्वी कारवाई झालेल्या मटकेवाल्यावर शनिवारी 1 जानेवारी रोजी पुन्हा पोलिसांनी कारवाई केली. शहरातील पूर्व भागात तील वैशाली नगर येथील अतुल पान स्टॉल च्या मागे सुरू असलेल्या मटका जुगारावर धाड टाकून दोघांजनांकडून 13000 रू व जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली बाबळगाव नाका राजीव नगर लातूर येथे करण्यात आली त्यांच्याकडून 11200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिसरी कारवाई बाबळगाव रोड वरील एमजे बार च्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली सतीश निवृत्ती सातपुते सिद्धेश्वर सुभाष बनसोडे राहणार इंद्रा नगर संजय गायकवाड राहणार बोधनगर यांच्याकडून 13 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौथ्या कारवाईमध्ये बौद्ध नगर येथील अजय एजन्सी च्या गोडाऊन च्या मागे विशाल राजकुमार कांबळे हर्ष प्रशांत सूर्यवंशी महादेव बाबुराव जाधव आणि विजय म्हस्के यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 28 हजार 670 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.हि कार्यवाही पोलीस अधीक्षक विशेष पथकाने केली असून यासंदर्भात चे चारही गुन्हे विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे प्रशासनाचे विशेष कौतुक सध्या होत आहे परंतु मटका किंग गुरुजी व त्याच्या पोराचे तीन राज्यांमध्ये साम्राज्य पसरले असून त्यांच्यावर केव्हा कारवाई करणार..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे. मटकाकिंग "गुरुजी" च्या पोरांचे अधिकृत क्लब कर्नाटक सीमेवर चालू असून त्यामधून मटक्याचे साम्राज्य चालवत असल्याचे आता लपून राहिले नाही.या मध्ये दिवसाढवळ्या तिरट, जुगार मटका चालू असल्याने परिसरातील लोकांची गर्दी होत आहे. परंतु अजून पर्यंत तपासणी अथवा कारवाई पोलिसांना करावीशी वाटत नाही.यावरुन लक्षात येते की, पोलिसांच्या डोळ्यावर "गुरुजी" ची पट्टी आहे का..? असा प्रश्न निर्माण होत आहे आणि ते खरे असल्याचे आता उघड होत आहे. शहरातील उघडपणे मटक्यावर पोलीस धाड मारून कारवाई करत असले तरीही मटकाकिंग गुरुजीच्या एजंटांना मात्र अजून पर्यंत पोलीस हात लावू शकले नाहीत उलट त्यांना मदत होईल त्याच पद्धतीने कार्यवाही चालू असल्याचे आता शहरात एकच चर्चा होत आहे. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे साहेबांचा उरलेला कार्यकाळ पाहिला तर मटका किंग" गुरुजी "वर कारवाई होणे आता अवघड असल्याचे मत व्यक्त होत आहे. परंतु लातूरकरांचा मात्र पोलीस अधीक्षक पिंगळे व त्यांच्या टीमवर पूर्ण विश्वास असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.