गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आयुक्त साहेब काय चाललंय लातूरमध्ये..!
30/12 /2010 रोजी माननीय उपसंचालक भूमि अभिलेख औरंगाबाद यांनी सदरचा वरील प्रमाणे चा आदेश रद्द करून नेताजी देशमुख यांची 29गुंठे जमीन त्यांच्या नावावर ठेवून उर्वरित राहिलेली जमीन डाल्डा फॅक्टरी यांच्या नावावर करावे असे आदेश निर्गमित केले. यावर नेताजी देशमुख यांनी त्या आदेशाविरुद्ध माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक 8308/2011 केली त्या आदेशांमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी उपसंचालक भूमी अभिलेख औरंगाबाद यांच्या आदेशास स्थगिती दिली असल्याचे आता समोर आली आहे त्यामुळे 29 गुंठे सोडून उर्वरित जागा ज्या ज्या व्यापाऱ्यांचे खरेदी खताद्वारे खरेदी केलेल्या आहेत त्यांचे मात्र आता धाबे दनाणले आहेत.या मध्ये काही अधिकार्यांचेही प्लाॅट असल्याचे समजते.आता तेही अडचणीत येणार असल्याने लातूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.या प्लाॅट धारका पैकी काही जण गुपचुप विकण्याचा प्रयत्न करत आहेत.यामधून घेणार्याची फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सर्वे नं38 ब मधील जागेवर विनापरवाना शेड
विना परवाने शेड मारून लाटला जातोय मलिदा..!
चुकीच्या मोजणी नकाशा चा आधार घेऊन अधिकार्याच्या संगणमताने लाटली होती डाल्डा फॅक्टरी ची जागा...!
1ते41प्लाॅट पाडून काही जमीनी विकल्या...!
महानगरपालिकेकडे सर्वे नं38 ब मधील जागेवर विनापरवाना शेड मारत असल्याची तक्रार दाखल होऊन दोन वर्षे उलटले तरी अद्याप पर्यंत कारवाई नाही..!
केव्हा करणार यावर कारवाई..?
लातूर- लातूर शहरांमध्ये बरेच शासनाच्या जागेचे वाद सध्या कोर्टात चालू असून त्यापैकी राजस्थान हायस्कूल च्या पाठीमागे असलेली अवसायक डाल्डा फॅक्टरीच्या 2 एकर 26 गुंठे चा जागेचा वाद ना कोणाला समजला ना कळला,बरेच वर्ष यावर प्रशाशनाचा कोर्टात लढा चालू होता अखेर त्यावर 2011 रोजी अवसायक डाल्डा फॅक्टरी ची 1एकर 37गुंठे वाचवण्यात प्रशाशकिय अधिकार्यास यश प्राप्त झाले असले तरीही आता पुढील अतिक्रमणाचा लढा मागील दोन वर्षापासुन चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
| महापालिकेकडे अतिक्रमण हटवण्यासाठी अर्ज देवून २वर्ष झाले |
दिनांक 11/2/20 रोजी महानगरपालिकेकडे कन्हेरी रोड लगत असलेल्या डालडा फॅक्टरी च्या कन्हेरी सर्वे नंबर 38 ब मधील जागेवर विनापरवाना दुकानाचे शेड उभे करत असल्या बाबत तक्रार दाखल झाली खरी,
परंतु त्यावर अद्यापपर्यंत कसलीही कारवाई न झाल्याने हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे .हे शेड मारून लाखोंरूपयाचे भाडे सध्या खाल्ले जात असल्याचे आता उघड होऊ लागले आहे .नेमका हा मलिदा कोण खात आहे..?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मौजे कन्हेरी येथील सर्वे नंबर 38 ब मधील 29 गुंठे जमिनीचा सर्वे नंबर 38 अ असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे मूळ मालक ताईमूर जंग कॅन्सर यांच्याकडून 1990मध्ये नोंदणीकृत खरेदीखत द्वारे नेताजी देशमुख यांनी खरेदी घेतली (38अ हा सर्वे नं मौजे कन्हेरी मधील खरेदी केलेल्या 29 गुंठे इतक्या क्षेत्रापुरते मर्यादित असलेले दर्शविले आहे) त्यानंतर जमीन मोजणी निरीक्षक भूमी अभिलेख लातूर यांच्याकडे 29 गुंठे क्षेत्र नावे लावण्याच्या अर्ज दाखल करण्यात आला. त्यासोबत 29 गुंठ्याची खरेदीखत लावलेले असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करुन 2 एकर 26 गुंठे क्षेत्र दाखवले. त्याप्रमाणे ही जमीन नेताजी देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आली. दिनांक 31/1/1991च्या आदेशान्वये तात्कालीन जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख लातूर यांनी कागदोपत्री नोंद घ्यावी असे आदेश पारित केले, हे सर्व एका चुकीच्या मोजणी नकाशाच्या आधार घेऊन भूकरमापकाशी संगणमत करून केली असल्याचे सध्या बोलले जात आहे. याबाबत अधीक्षक भूमि अभिलेख लातूर यांच्या न्यायालयात रिट याचिका अवसायक डालडा फॅक्टरी यांनी दाखल केली, परंतु अधीक्षक भूमि अभिलेख लातूर यांनी सुद्धा प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रा कडे दुर्लक्ष करून जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख लातूर तत्कालीन अधीक्षक यांनी 2 एकर 26 गुंठे चा निकाल कायम ठेवला यानंतर उपसंचालक भूमि अभिलेख औरंगाबाद यांच्या न्यायालयासमोर सदर प्रकरणी डालडा फॅक्टरी यांनी याचिका दाखल केली.
त्यानंतर दिनांक 11/ 2 /2020 रोजी महानगरपालिका आयुक्त यांना कनेरी रोड लगत असलेल्या सर्वे नंबर 38 ब मध्ये जागेवर नेताजी देशमुख दुकानाची शेड उभा करत असल्याची तक्रार अर्ज डालडा फॅक्टरी यांच्यातर्फे देण्यात आला खरा परंतु त्यावर दोन वर्षे उलटूनही कारवाई झाली नसल्याने आता त्या शेडचे लाखो रुपये भाडे नेमके कोण खात आहे ..?ते समजण्या पलीकडे नसले तरी मात्र आयुक्त साहेब यावर काय कारवाई करणार..? याकडे लातूरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
"या बाबत सर्वे नं38ब मधील जागेचा 2010मध्ये कोर्टा ने प्रशाशनाच्या बाजुने निकाल दिला असुन, त्या निकाला मध्ये नेताजी देशमुख यांची 29गुंठे सोडून उरलेली डाल्डा फॅक्टरी यांच्या नावावर करावी असा स्पष्ट उल्लेख असुन त्यामुळे 38ब या जागेमध्ये नेताजी देशमुख यांचा काहीही संबंध नाही,तरी सध्या त्याजागेत बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड हे अनधिकृत उभारले असून त्यावर महानगरपालिकेला याबाबत पत्र देऊन दोन वर्ष उलटले आहे ,आम्ही लवकरच पुन्हा एकदा आयुक्तांना याबाबत कळवून लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी कळवणार असल्याचे सांगितले".
ए.एस. कदम
प्रशासकीय अधिकारी
(अभिहस्तांकी, को-ऑपरेटिव्ह ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड, लातूर. )
आता प्रश्न उर्वरित जमीन खरेदी खत करून घेतलेल्या त्या बड्या व्यापाऱ्यांचे काय होणार..? ज्यांच्याकडून या व्यापाऱ्यांनी जमिनीचे खरेदीखत केले आता त्यांचे काय होणार..?नेमके कोण कारवाई करणार ?हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच असले तरीही मात्र यामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे दिसून येत आहे.