गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
चाकुर चे नायब तहसीलदार शेषेराव टिपरसे यांना पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
लातूर- बँकेचा बोजा असलेल्या जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना चाकुर चे नायब तहसीलदार शेषेराव टिपरसेयांना लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चाकुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रार आई व बहीण यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार झाला होता तक्रारदार व त्यांच्या वडिलांनी बँकेचे कर्ज घेतले होते त्यामुळे जमिनीवर बँकेचा बोजा होता त्यामुळे जमिनीचा फेरफार नोंद घेण्यास बँकेचा अक्षप होता सदर अक्षप अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देऊन मदत करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी चाकूर तहसील कार्यालयातील महसूल विभागाचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार शेषराव शिवराम टिप्परसे वय सत्तावन्न यांनी तक्रार दाराकडे केली होती.याबाबतची तक्रार लातुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्यानंतर तीन जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली व दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास चाकूर तहसील कार्यालयात तक्रार केली असता नायब तहसीलदार शेषराव टिप्परची यांनी पंधरा हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली याप्रकरणी चाकुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चाकूर पोलिसांनी सांगितले