आमदार अभिमन्यु पवार यांच्या पाठपुराव्याला यश; नूतन औसा न्यायालयीन इमारतीत फर्निचरसह इतर सुविधा पुरविण्यासाठी १ कोटी ३२ लाख रुपयांच्या वाढीव निधीला प्रशासकीय मंजुरी.
औसा-आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना औसा येथील नूतन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी ८ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. नूतन न्यायालयीन इमारतीत फर्निचरसह इतर अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याने मां श्री अभिमन्यु पवार आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन औसा न्यायालयीन इमारतीत फर्निचर व इतर सुविधा पुरविण्यासाठी १५% वाढीव निधी मंजूर करावा अशी विनंती केली होती. पुढे तसा प्रस्तावही मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय लातूर जिल्हा नियोजन समितीच्या (२०२१-२२) बैठकीत या कामासाठी पाठपुरावा केला होता तसेच विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे सदरील मागणीकडे लक्ष वेधले होते. या सर्व पाठपुराव्याला यश आले असून औसा न्यायालयीन इमारतीत फर्निचरसह इतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी १ कोटी ३२ लाख रुपयांच्या वाढीव निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार व याकामी मला मार्गदर्शन केल्याबद्दल विरोधी पक्षनेते मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार आमदार श्री.अभिमन्यु पवार यांनी मानले.
जुन्या न्यायालयीन इमारतीचे तातडीने पाडकाम करण्यात यावे व पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नूतन इमारतीत फर्निचरसह इतर सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. औसा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड श्रीधर जाधव व तालुक्यातील इतर विधिज्ञ न्ययालयीन इमारतीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सातत्याने होत होती, त्या सर्वांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान आमदार श्री.अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केले.