आझादी का अमृत महोत्सव समितीच्या सदस्य पदी
डॉ नारायण सूर्यवंशी यांची निवड
शिरूर अनंतपाळ :- शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाळ येथील इतिहास विभागप्रमुख डॉ नारायण सूर्यवंशी यांची लातूर जिल्हा 'अमृत महोत्सव समिती ' चे सदस्य म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.आपण स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहोत.हे अमृत महोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून साजरे होणे अपेक्षीत आहे.विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती व देशाप्रति प्रेम,स्वाभिमान व आस्था निर्माण होऊन राष्ट्र पुनरूत्थान प्रक्रियेसाठी तो सज्ज व सक्षम होऊ शकतो.हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आझादी का अमृत महोत्सव विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे. या निवडीबद्दल संस्था आध्यक्ष प्रताप माने उपाध्यक्ष ऍड सुतेज माने, सचिव पद्ममाकर मोगरगे,कोषाध्यक्ष तथा लातूर जिल्हा बँकेचे संचालक जयेश माने,प्राचार्य डॉ ओमप्रकाश जाधव, स्टाफ सेक्रेटरी डॉ प्रशांत पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले