गोरक्षण संस्थेत "गायी" मरणाच्या दारात..!
एका गायी चा जीव धोक्यात!
अक्षरशहा: करोड़ों ची मालमत्ता असताना, चार्याविना गो-मातेचे होतायत हाल!
ना प्रशासनाचे लक्ष,ना गोरक्षण समितीचे लक्ष,ना धर्मदाय अधिकार्यांचे लक्ष,ना पशु संवर्धन विभागाचे लक्ष,ना स्थानिक प्राणी क्लेश समीतीचे लक्ष....!ा
"त्या" गायीचा मृत्यु झाल्यास जबाबदार कोण?
कोणावर होणार गो हत्येचा गुन्हा दाखल?
लातूर-लातूर शहरामध्ये भंगार मार्केट कडे जाणार्या रोडवर मागील कित्येक वर्षा पासुन गोरक्षण संस्थेची जागा आसुन,त्या जागेत एका बाजुला गायींची संगोपण आणि देखभाल करण्यासाठी जागा आहे.या जागेत दि.10डिसेंबर रोजी साधारण साडे पाच च्या सुमारास या गोशाळेत जाऊन पाहणी केली असता येथील जनावरांची दयनीय अवस्था आढळून आली. गोरक्षण संस्थेमध्ये एक गाय सुप्त अवस्थेत पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,याबाबत थोडी विचारणा केली असता कोणी सांगण्यासही त्या ठिकाणी धजत नव्हते,एका गार्ड वर हे सर्व आवलंबुन असल्याचे वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेमध्ये तब्बल 250गायी आसल्याची माहिती मिळाली तसेच या गायींना रोज 10किलो ओला आणि 10किलो सुका चारा लागतो याबरोबर चुनी आहार आणि पेंडची पण आवश्यकता आसते,परंतू हे संस्था चालवणारे संस्थाचालक मात्र हैवाणालाही मागे सोडतील आशी वागणुक या मुक्या प्राण्यांना मिळत आहे,ना ओला चारा मिळतो ना चुनी आहार फक्त साधा सुका चारा टाकुन मोकळे होत आहेत, चारा व औषधोपचाराविना अनेक जनावरे मरणासन्न अवस्थेत असली तरी संस्थेला त्याचे देणेघेणे नसल्याचे ठळकपणे लक्षात येत आहे.संस्थेच्या दुर्लक्षामुळे मेलेली जनावरे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून तेथेच पुरली जातात की काय?असा संशय निर्माण होत आहे.विशेष म्हणजे मागील एक महिण्यांपासुन ओला चारा आलाचं नसल्याचे सांगण्यात येत आहे.वेटरनरी डॉक्टर नी रोज सर्व गायीची तपासणी करणे अवश्यक असतानाही ते होताना दिसत नाही.पशुसंवर्धन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे
.या गोरक्षण समितीचे संस्थाचालक मात्र समीतीच्या उत्पन्नावर डल्ला मारुन स्वत:मात्र गब्बर होत आहेत.या संस्थेकडे शहराच्या मध्यवर्थी ठिकाणी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता असुन तब्बल ५००एकर विविध ठिकाणी जमिन आहे.तसेच बॅंकेमध्ये असलेल्या ठेवीच्या रुपातूनही संस्थेला व्याज मिळते.आशा प्रकारे संस्थेचे करोडोरुपया मध्ये मिळकत असुन सुध्दा ,गायींची अशी दयनीय अवस्था पाहून अक्षरशः:डोऴयातून पाणी आले. विशेष म्हणजे हा प्रकार कित्येक वर्षा पासुन असाच चालू असल्याचे यावरून आता समोर येत आहे.याकडे मात्र ना प्रशासनाचे लक्ष,ना गोरक्षण समितीचे लक्ष,ना धर्मदाय अधिकार्यांचे लक्ष,ना पशु संवर्धन विभागाचे लक्ष,ना स्थानिक प्राणी क्लेश समीतीचे लक्ष....!
"त्या" गायीचा मृत्यु झाल्यास जबाबदार कोण?
कोणावर होणार गो हत्येचा गुन्हा दाखल?
अशी गंभीर स्थिति निर्माण झाली असुन यावर आता लवकरात लवकर कार्यवाही करने अवश्यक बनले आहे.स्त:ताची घरे भरणार्या संस्थाचालकांनी
या संस्थेची उद्दीष्ट धुळीत मिळवले आहे. आशा नराधम संस्थाचालकांची संस्था बरखास्त करुन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी व त्यावर प्रशाशन नेमुन संस्थेची संपुर्ण चौकशी करण्यात यावी अशी तिव्र भावना लातूरच्या नागरिकांकडून व्यक्त होवू लागली आहे.