Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अधिकारी "समाधान" तर स्वेटर दुकानदार खुश..! अनधिकृत15ते 16स्वेटरचे दुकाने ठाण मांडून..! .हे स्वेटर दुकानदारांचे "अनधिकृत" अतिक्रमणचं.!

 अधिकारी "समाधान" तर स्वेटर दुकानदार खुश..!

अनधिकृत15ते 16स्वेटरचे दुकाने ठाण मांडून..!

.हे स्वेटर दुकानदारांचे "अनधिकृत" अतिक्रमणचं.!




लातूर: यंदा पावसाळा उशिरा संपला असून आता हवेत गारवा वाढु लागल्याने गुलाबी थंडी पडायला सुरवात झाली आहे. सकाळी फिरायला जातांना गरम कपडे, मफलर, कान टोपीमध्ये वापरतांना लातूर कर

 दिसू लागले आहेत, तर महिलाही फिरायला जातांना स्वेटर्स आणि स्कार्फ वगैरे गरम कपडे वापरू लागले आहेत. थंडीला सुरूवात होवू लागल्याने गरम कपड्यांच्या दुकानेही थाटली जात आहेत. नागरीकांचेही पाय या दुकानांकडे वळू लागले आहेत.



लातूरमध्ये त्यानिमित्ताने शहराच्या विविध ठिकाणी दरवर्षी प्रमाणे स्वेटरचा धंदा करणार्यांना महानगरपालिकेकडून जागा देण्यात आली आहे. परंतू  गुळ मार्केट कडून गांधी चौकात येणार्या रोडवर 15ते 16स्वेटरचे दुकाने हे अनधिकृत बसले असुन त्यांच्याकडे "त्या" जागेचा कसल्याही प्रकारचा परवाना देण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ठंडी सुरु होण्या आगोदर लातूर शहराच्या विविध ठिकाणी स्वेटर दुकानदारांना रोडवर महानगरपालिकेकडून स्वेटर विकण्यासाठी परवाना देण्यात आली आहे.परंतू लातूर मधिल काहि लोकांनी मिळून स्वेटरचा माल आणुन गुळ मार्केट कडून गांधी चौकात येणार्या रोडवर 15ते 16स्वेटरचे दुकाने अनधिकृत बसवले असुन, त्यांच्याकडे "त्या" जागेचा कसल्याही प्रकारचा परवाना देण्यात आला नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.

विशेष म्हेणजे हे सर्व दुकाने नाॅन हाॅकर्स झोन मध्ये बसले असुन.या बाबत क्षेत्रीय अधिकार्यांची भेट घेवून महिती घेतली असता लवकरच "त्या" सर्व दुकानांना नोटीसा देणार असल्याचे सांगीतले आहे.परंतू जर परवानाच नसेल तर "नोटीसा"देवून फायदा काय होणार?असे विचारले असता त्यांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही,तरीही त्यांना नोटीसा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यावर हे समजते की अधिकारी "समाधान"तर स्वेटर दुकानदार खुश..! नोटीस देण्याचे सांगुन एकप्रकारे त्यांना वेळ देणे हेच यातून निश्पन्न होत असल्याची जोरदार चर्चा सध्या लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.हे स्वेटर दुकानदारांचे "अनधिकृत "अतिक्रमणचं असुन लवकरात लवकर यावर कार्यवाही करून ते दुकाने काढुन टाकण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post