Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

क्रीडा संकुल मधील शासनाने खर्च केलेले (Rehyabilation Center) पुनर्वसन केंद्र गायब..!

 क्रीडा संकुल मधील शासनाने खर्च केलेले (Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्र गायब..!  

लातूर-क्रीडा संकुल येथे 2018 मध्ये माजी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कार्यकाळात भूमिपूजन केलेले (Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्रावर शासनाचा निधी खर्च करण्यात आला होता, परंतु तेवढ्या निधी मध्ये थोडक्या साहित्यासह फक्त लोखंडाचा ढाचाच उभा राहिला आणि पुढे तो प्रकल्प रखडला कि रखडवला हा संशोधनाचा भाग असला तरी तो सध्या गायब..!असल्याची जोरदार चर्चा क्रिडा संकुल च्या आवारात होवू लागली आहे.आता तोच खर्च केलेला प्रकल्प एका प्रायवेट फिटनेस क्लब ला पीपीटी(भागीदारी) तत्वावर देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



जिल्ह्यातील खेळाडुंसाठी क्रीडा संकुल येथे 2018 मध्ये माजी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कार्यकाळात भूमिपूजन केलेले ( Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्रावर शासनाचा निधी खर्च करण्यात आला होता, परंतु हे सेंटर नेमके कुठे आहे हे आजपर्यंत कोणालाही समजले नाही किंबहुना हे सेंटर पुर्ण झाले होतै की नाही हे ही कोणास माहिती नसल्याने खेळाडुंची मात्र तरांबळ उडाली आहे..या सेंटर मध्ये मसाज पार्लर, जिम ,इलेक्ट्रो थेरेपी अशा सुविधा विनामूल्य खेळाडुंना मिळणार होत्या.परंतू बरेच खेळाडूंना याबाबत माहिती नसल्याकारणाने ते यापासुन वंचित आहेत..आता मात्र या जिल्हा- अधिकार्यांने भ्रष्टाचाराचा कळस केला असुन,सर्व साधारण खेळाडुचे हक्काचे ( Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्र गिळंकृत केल्याचे आता समोर येत आहे. 2018 पासून 2021 पर्यंत हे सेंटर नेमके कुठे उभे केले..? ते अद्याप माहिती नसल्याने सर्वसामान्य खेळाडुंची हेळसांड होत आहे. या(Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्र सेंटर मध्ये हजारो टन लोखंड वापरून हे उभे केले तरी हे सेंटर सापडत नाही हे मात्र नवलचं..! मनावे लागेल .या सेंटर मध्ये मसाज पार्लर, जिम ,इलेक्ट्रो थेरेपी अशा सुविधा सर्वसामान्य खेळाडुंना विनामूल्य मिळणार होत्या परंतु क्रीडा संकुल मधिल हे(Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्र नेमके गेले कुठे..? याचा थांगपत्ता आजुनपर्यंत लागला नाही.  

नेमके हे (Rehabilitation Center) पुनर्वसन केंद्र कागदावरचं राहिले का..? असा सवालही आता उपस्थित होत आहे. 



  याबाबत जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांची भेट घेवून महिती घेतली असता,त्याबाबत त्यांनी सांगीतले की,हे सेंटर 15वर्षासाठी,300 स्क्वेरमिटर जागा ,महिना 1लाख 11हजार प्रमाणे भाड्याने देण्यात आले आहे, हे सेंटर शासनाचा निधी वापरून तयार करण्यात आले असले तरी मात्र पुढील सुविधे साठी लागणारा निधी,त्याबाबत अत्यावश्यक यंत्र सामुग्री ,त्याचे मेंटनन्स शाशन स्तरावर करणे आवघड होणार होते,तसेच जिल्ह्यातील खेळाडुंच्या दुखापती तसेच त्यांचे शारिरिक फिटनेस महत्वाचे असल्याने हे ,सेंटर पीपीटी तत्वावर देणे अनिवर्य होते..या सेंटर मध्ये मसाज पार्लर, जिम ,इलेक्ट्रो थेरेपी अशा सुविधा विनामूल्य खेळाडुंना मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच हे सेंटर पीपीटी तत्वावर दिल्यापासुन बर्याच खेळाडुंना लाभ झाला असल्याचे सांगीतले आहे.तसेच आशाच प्रकारे जिल्हा क्रिडा संकुल मधिल दुकाने ,रिकाम्या जागा हे भाडेत्वावर देवून क्रिडा संकुलचा मेंटनन्स निघत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

या बाबत जिल्हाक्रिडा अधिकारी यांनी सावरासावरी केली असली तरी,शासनाने करोड़ों रुपए खर्च केलेले सेंटर साहित्यासहित प्रायवेट फिटनेस क्लब च्या घशात घातले असल्याचे आता उघड बोललले जावू लागले आहे  .नेमके आता शाशनाने कोणाचे पुनर्वसन केले हे मात्र समजण्या पलिकडे आहे. विशेष म्हणजे पीपीटी (शाशनाच्या भागीदारी) तत्वावर असुन सुध्दा त्या क्लब चालकाने स्वत:च्या नावचा बोर्ड लावल्याने खेळांडु मात्र संभ्रमात आहेत. या गंभीर विषयाकडे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी विशेष लक्ष घालून त्याची चौकशी करावी अशी मागणी आता सर्वसामान्य खेळाडुंकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post