मौजे एरंडी येथील झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु
पोलीस स्टेशन औसा अंतर्गत मौजे एरंडी येथील विनोद पंढरी बनसोडे वय 26 वर्षे मयत याने दिनांक 21/12/2021 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हनुमंत विश्वंभर कोल्हाळे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला होता त्यावरून हानमंत विश्वंभर कोल्हाळे, अनुराधा हनुमंत कोल्हाळे, वाघंबर विनायक कोल्हाळे दिगंबर विनायक सर्व राहणार एरंडी यांनी त्यास तू अपरात्री घरात का आलास या कारणावरून संगणमत करून काठीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सदर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन औसा येथे माहिती मिळताच घटनास्थळी मौजे एरंडी येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन , पोलीस निरीक्षक श्री शंकर पटवारी ,सपोनि श्री डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल 167 वेरुळकर 736 सूर्यवंशी , पोह/१८ गुरव असे तात्काळ रवाना होऊन घटनास्थळ येथे भेट देऊन मयताचे प्रीत शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखाना औसा येथे पाठविले मयताचे वडील नामे पंढरी सोपान बनसोडे वय 62 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो स्टे औसा येथे गुर नं 396/21 कलम 302 341 342 ३४ भारतीय दंड संहिता व कलम 3, 2,(v) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील वरील चारही आरोपी नामे १. हनुमंत विश्वंभर कोल्हाळे 2. अनुराधा हनुमंत कोल्हाळे ३. वाघंबर विनायक कोल्हाळे 4. दिगंबर विनायक कोल्हाळे सर्व राहणार एरंडी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून पुढील तपास अधिक तपास माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा चार्ज औसा डॉ दिनेश कुमार कोल्हे माननीय पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात करीत आहेत