Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

NEET २०२१ मध्ये मोटेगावकर सरांच्या RCC चा भारतात झेंडा अनिरुद्ध डाखरे तब्बल ७१० गुण घेऊन PCB मध्ये देशात ३८ वा 28 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळाले 650 पेक्षा अधिक गुण

 NEET २०२१ मध्ये मोटेगावकर सरांच्या RCC चा भारतात झेंडा

अनिरुद्ध डाखरे तब्बल ७१० गुण घेऊन PCB मध्ये देशात ३८ वा

28 पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांना मिळाले 650 पेक्षा अधिक गुण 


लातूर : प्रा. शिवराज मोटेगावकर आणि संपूर्ण RCC च्या टीमने घेतलेले कठोर परिश्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यासाच्या जोरावर नुकत्याच जाहीर झालेल्या NEET २०२१ मध्ये प्रा. मोटेगावकर सर संचालित  RCC च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे.  अनिरुद्ध डाखरे याने  NEET परीक्षेत  ७२० पैकी तब्बल ७१० गुण घेऊन ऑल इंडिया रँक ३८ वा आला आहे. त्याचबरोबर अथर्व वट्टमवार ७०५, ओंकार काबरा ७००, श्रेया आरु ६९६, जेनिका कलाले ६९० गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार RCC च्या 28 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 650 पेक्षा अधिक गुण मिळविल्यामुळे NEET मध्ये पुन्हा एकदा प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC चा झेंडा संपूर्ण भारतात फडकला आहे.



वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या NEET २०२१ परीक्षेचा निकाल मोठ्या प्रतिक्षेनंतर सोमवार, दि. १ नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर झाला. प्रतिवर्षी प्रमाणेच यंदाही आपल्या उज्ज्वल यशाची दैदिप्यमान परंपरा कायम राखत प्रा. मोटेगावकर सर संचालित  RCC च्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण समोर आले प्रसंगी विद्यार्थ्यांनी NEET-२०२१ ची संपूर्ण तयारी ऑनलाईन पद्धतीनेच केली. दरम्यान प्रा. शिवराज मोटेगावकर सर आणि RCC च्या PCB च्या टीमने ऑनलाईन शिक्षणतही ऑफलाईन सारखेचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सुपर स्टॅंडर्ड बुकलेट देण्यात आले. बुकलेट मधील समाविष्ट प्रश्न आणि NEET परीक्षेतील संभाव्य प्रश्न  हे एकतर तंतोतंत सारखे, सारख्या पद्धतीचे किंवा सारखे परंतु व्हॅल्यू चेंज आले. तसेच 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार विडिओ लेक्चर, प्रत्येक लहान-मोठ्या अडचणी, डाऊटस् सुटतील अशा पध्दतीने प्रा. मोटेगावकर सर आणि RCC च्या तज्ञ प्राध्यापकांनी केले. त्यामुळेच  RCC च्या विद्यार्थ्यांना NEET मध्ये उत्तुंग यश संपादन करण्यात आले. RCC च्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे RCC च्या गुणवत्तेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. यंदाच्या नीट परीक्षेच्या निकालात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयात RCC चे विद्यार्थी चमकले आहेत. यामध्ये केमिस्ट्री विषयात अनिरुद्ध डाखरे आणि अथर्व वट्टमवार या दोघांनी १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत तर १७० पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल  १९ विद्यार्थी आहेत. फिजिक्स विषयात देखील RCC च्या विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली असून 150 पेक्षा जास्त गुण घेणारे 25 विद्यार्थी आहेत तर बायोलॉजी मध्ये पहिल्याच वर्षी 360 पेक्षा जास्त गुण घेणारे 20 विद्यार्थी आहेत .त्याचबरोबर PCB मध्ये ७२० गुणांपैकी ६०० पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 152 विद्यार्थी असल्यामुळे प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC ने आपल्या यशाचा आलेख आणखीनच उंचावला आहे.



पहिल्याच वर्षी बायोलॉजीत घडविला इतिहास


मोटेगावकर सरांच्या RCC मध्ये केमिस्ट्री, फिजिक्स विषयानंतर बायोलॉजी विषयही गतवर्षी पासून सुरू करण्यात आला. आता संपूर्ण PCB हे एकाच छताखाली असल्यामुळे विद्यार्थ्यांची तिन्ही  विषयांचे अत्यंत चांगली तयारी करून घेण्यात आली. आणि याचेच फलित नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात दिसून आले. पहिल्याच वर्षी RCC च्या विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात नेत्रदीपक यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ३६० पैकी ३६० गुण मिळाले असून पहिल्याच वर्षी बायोलॉजीत RCC ने घडविला इतिहास घडविला आहे. त्याचबरोबर ३५५ पेक्षा अधिक गुण घेणारे ९१ पेक्षा अधिक विद्यार्थी हे RCC चे 



मोटेगावकर सरांच्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहित झालो

RCC ने रॅपिड रिव्हिजन, नीट सारथी प्रोग्राम लॉंच  करून याद्वारे ११ वी आणि १२ फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयाची संपूर्ण तयारी करून घेतली. दरम्यान, अभ्यास करताना मी बऱ्याचदा गोंधळून जायचो मात्र, प्रा. मोटेगावकर सरांच्या प्रेरणादायी अशा मार्गदर्शनामुळे प्रोत्साहन मिळाल्यामुळे पुन्हा चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागायचो. माझ्या या यशामध्ये माझे आई-वडील, प्रा. मोटेगावकर सर आणि RCC चे मोठे योगदान आहे.


- अनिरुद्ध डाखरे, 

NEET-२०२१ मध्ये देशात ३८ वा,



"नीट सारथी" प्रोग्राम ठरला लक्षभेदी

NEET-२०२१ मध्ये RCC च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले असून हे विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून केलेल्या अभ्यासरूपी परिश्रमाचे फळ आहे. दरम्यान एकाच छताखाली PCB हे आव्हान होते, परंतु RCC च्या संपूर्ण टीमने केलेल्या काटेकोर नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यामुळे हे आव्हान लीलया पेलले. यामध्ये यंदाच्या NEET परीक्षेत महत्वाची भूमिका बजावली ती "नीट सारथी" या प्रोग्रामने. कारण या प्रॉग्राममध्ये देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या यशाचा मार्ग सुकर केला. त्यामुळे RCC चा 

"नीट सारथी" प्रोग्राम लक्षभेदी ठरला आहे. तरी सर्व NEET परीक्षेत उत्तुंग यश मिळविणाऱ्या भावी डॉक्टरांचे खूप-खूप अभिनंदन.


 प्रा. शिवराज मोटेगावकर, संचालक

RCC पॅटर्न लातूर-नांदेड

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post