पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी विविध संस्था संघटना नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी,उपस्थितांना दिल्या दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा.....!
लातूर (प्रतिनिधी): (शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर २१)
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून उपस्थितांना दिवाळीच्या (दिवाळी पाडवा) हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच उपस्थितांकडून मिळालेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
यावेळी लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, नगरसेवक राजकुमार जाधव, ओमप्रकाश पडिले, गौरव काथवटे, रमेश राठी, समद पटेल, सुनील पडिले, नागसेन कामेगावकर, श्याम देशमुख, हनुमंत पवार, व्यंकटेश पुरी, विजयकुमार साबदे, गोविंद बोराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, उपसभापती मुन्ना उपाडे, विकास कांबळे, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, नंदकुमार देशमुख गोपाळराव देशमुख, प्रा.अनिल देशमुख, लिज्जत पापड लातूरच्या संचालिका शिला वाघमारे, ज्योती शिंगण, उमेश पाटील, पंडित शिंदे, देवीदास कांबळे, प्रल्हाद कांबळे, सुमेध सोनकांबळे, एन.डी.सोनकांबळे, पत्रकार यशवंत पवार, एम.पी.देशमुख, सतीश हलवाई, जब्बार सगरे, प्रभाकर बंडगर, अविनाश देशमुख, प्रा.संजय जगताप, लक्ष्मण कांबळे, केशव कांबळे, अमित शेळके आदीसह विविध संस्था संघटनाचे सदस्य काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.