Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सुपुत्र श्री.जयेश माने यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

 शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सुपुत्र  

श्री.जयेश माने यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर  मतदारसंघातून बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड


शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सुपुत्र शिवनेरी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर  मतदारसंघातून बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली असून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आणखीन एका संचालकाची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड झालेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल दिलीपरावजी देशमुख  धीरज भैया देशमुख  जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख शिवनेरी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रताप माने सुतेज माने व  त्यांचा मित्रपरिवातून अभिनंदन केले जात आहे. 



यासंदर्भात जयेश माने यांच्याशी संपर्क साधला असता कैलासवासी एडवोकेट विश्वभरराव माने साहेब यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या जागेवर संचालक म्हणून काम केले त्यांच्या पश्चात आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी मला बिनविरोध संचालकपदी निवड करून काम करण्याची संधी दिली ही संधी म्हणजेच एडवोकेट डि माने साहेबांना दिलेली श्रद्धांजली असून त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची  प्रतिक्रिया जयेश माने यांनी  बोलताना दिली.




Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post