रेणापुर तालुक्यात रोजगार हमी योजना, रमाई घरकुल योजनेत लाखोचा भ्रष्टाचार
* गट विकास अधिकारी यांना निलंबीत करून चौकशी करण्याची मागणी
लातूर प्रतिनिधी :- रेणापूर तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शौचालय, रोजगार हमी योजना अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, शोष खड्डे
ची कामे बोगस करून लाखो रूपयचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे हे सर्व गटविकास अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या सहमतीने करण्यात आलेली असून त्यांना निलंबित करून १ जानेवारी २०१५ ते १०नोव्हेबर २०२१ या कालावधीतील सर्व कामाची सर्व रेकॉर्डची बँक खात्याची रोजगार हमी मस्टर जी मजुरांच्या कामाची कामाच्या कॉलिटी जी तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकारी लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या कामावरील मजूर बोगस आहेत काही ठिकाणी कामे न करता बोगस मजूर दाखवून दिले उचलेली आहेत. पाणी पुरवठा विहीरीची सर्व कामे बोगस करून बिले उचललेली आहेत. अनेक गावामध्ये शौचालय न बांधता, शौषखड्डे न पाडता बिले उचलेली आहेत. काही ठिकाणी नियमबाह्य मजूरांच्या नावे बिले उचलेली आहेत. घरकुल योजनेमध्ये मध्ये अनेक लाभार्थ्यांना घरे न बांधता पैसे टाकण्यात आले आहेत. काही लाभार्थ्यांनी तर घरे न बांधता पैसे उचलेले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी दोन ते तीन घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. सर्व बोगस कामांना व बोगस कामे करणाऱ्यांना पाठीशी घालून सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करून लाखो रुपयांची शासनाची लूट केली आहे. सर्व बोगस कामे ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, इंजिनिअर, रोजगार योजनेचे विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या सहमतीने करण्यात आले असून बोगस कामाच्या माध्यमातून लाखो रूपयाची लुट केली आहे त्यांना निलंबित करून तात्काळ चौकशी करावी हडप केलेला निधी वसुल करण्यात यावा अशी मागणी प्रमोद वाघमारे, संजय कांबळे, तुकाराम कांबळे, विकी उदारे, नितीन जोगदंड, सतीश चव्हाण, अझर शेख, सचिन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.