लातूर शहरात संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचे प्रभागनिहाय आयोजन
*पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते* *९ नोव्हेंबर रोजी शुभारंभ*
लातूर प्रतिनिधी-
विविध घटकातील निराधार व्यक्तीना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अधिकाधिक पात्र लोकांना लाभ मिळावा म्हणून लातूर शहरात प्रभागनिहाय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १२ या ठिकाणी सकाळी ९ वा. करण्यात येणार आहे.
विधवा,परितक्त्या, घटस्फोटीत महिला तसेच अपंग आणि जेष्ठ नागरिकांची उदरनिर्वाहाची सोय व्हावी याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहे . या योजने अंतर्गत येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची गैरसोय दूर होऊन अधिकाधिक पात्र लोकांना लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील सर्व १८ प्रभागात अभिनव अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत करण्यात आले आहे.
या अंतर्गत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १ करीता १३ नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय सूळ गल्ली या ठिकाणी समाधान शिबीर होणार असून प्रभाग २ करीता १४ नोव्हेंबर रोजी अब्दुल कलाम शाळा बरकत नगर, प्रभाग ३ करीता २० नोव्हेंबर रोजी शाहू नगर ग्रीन बेल्ट बाभळगाव रोड लातूर, प्रभाग ४ करीता २१ नोव्हेंबर रोजी रुखीया शाळा काझी मोहल्ला शास्त्री नगर, प्रभाग ५ करीता २७ नोव्हेंबर रोजी गणेश मंदिर कोल्हे नगर, प्रभाग ६ करीता २८ नोव्हेंबर रोजी हमाल भवन मार्केट यार्ड, प्रभाग ७ करीता ४ डिसेंबर रोजी डॉ.मोहम्मद इक्बाल स्कूल शाहवली मोहल्ला, प्रभाग ८ करीता ५ डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा समाज मंदिर रत्नापूर चौक, प्रभाग ९ करीता ११ डिसेंबर रोजी पूर्णानंद मंगल कार्यालय सावेवाडी, प्रभाग १० करीता १२ डिसेंबर रोजी मनपा शाळा क्रमांक २८ इंडिया नगर, प्रभाग ११ करीता १९ डिसेंबर रोजी बौद्ध विहार विक्रम नगर, प्रभाग १२ करिता ९ नोव्हेंबर रोजी दत्त मंदिर प्रकाश नगर, प्रभाग १३ करीता २५ डिसेंबर रोजी लोकसेवा डीएड कॉलेज, प्रभाग १४ करीता २६ डिसेंबर रोजी गौतम नगर समाज मंदिर, प्रभाग १५ करीता १ जानेवारी रोजी मनपा सदस्य राजकुमार जाधव यांच्या घरासमोर नारायण नगर, प्रभाग १६ करीता २ जानेवारी रोजी बौद्ध नगर गार्डन समता नगर, प्रभाग १७ करीता ८ जानेवारी रोजी विशाल शाळा प्रगती नगर, आणि प्रभाग १८ करीता ९ जानेवारी रोजी शांती निकेतन प्रार्थमिक शाळा पटेल नगर लातूर या ठिकाणी सदरची संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिरे पार पडणार आहेत .
तरी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी शिबीर स्थळी येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड प्रत्येकी ३ झेरोक्स प्रती , पासपोर्ट साईज ६ फोटो, विधवासाठी पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र झेरोक्स ३ प्रती, दिव्यांग (अपंग) ५० टक्केचे ऑन लाईन वैद्यकीय शासकीय प्रमाणपत्र झेरोक्स ३ प्रती, कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्ही. (एड्स) व अन्य दुर्धर आजाराचे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र झेरोक्स ३ प्रती आपल्या सोबत आणावीत असे आवाहन लातूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे मनपा सदस्य, पक्ष पदाधीकारी,सदस्य, प्रभाग समन्वयक, बूथ प्रमुख, कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------