महावितरण लातुर शहर शाखा कार्यालय क्रमांक 03 च्या वतीने..गरजू लोकांना दिवाळी निमित्त फराळ , ब्लँकेट, फटाके, महीलांना साडी..अशा विविध वस्तुचे वाटप
किंतु,परंतु,लेकिन,यदी,अगर,मगर, काश नहीं करते कुछ कर गुजरने वाले बहानो की तलाश नहीं करते...*
दिवाळी संबध भारतीयांचा आवडता उत्सव, घरोघर एकच लगबग..स्वादिष्ट फराळाची मेजवानी..नविन कपडे व फटाक्यांची उत्सुकता लहान थोरात एकसमान..वर्षभर विखुरलेले कुटुंब या एका सणानिमित्त आपापल्या जिवाभावाच्या रक्त नात्या घरट्यात एकञ येते...परंतु जन्माचेच ज्यांच्या नशिबी दारिद्र्य आले..माणसा सारखा माणुस असुन देखील अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांपासुन वर्षानुवर्ष अलिप्त राहुन भटकंती करून जगावे लागणे आले..मिळेल त्या जागी पाल (झोपडी) उभारून मिळेल त्या अन्नावर जगुन भला मोठा कटुंबाचा गाडा ओढत शुन्य प्रगती आयुष्याला बिनदिक्कत जगणार्या या समाज बांधवांना दिवाळीचं काय?
अनेक सनोत्सव येतात आणी जातात..पालावरचं जग माञ मंगळ ग्रहावरील पाण्यासारखं अनभिज्ञच...परंतु याच मातीत असे कांही थोर महापुरुष जन्मा येऊन गेले आणी ज्यांनी स्वतःसाठी जगत असताना ईतरांसाठी देखील जगले पाहीजे हा विचार या मातीत रूजवला अशा तमाम थोर महापुरुषांच्या विचार धारेला अभिप्रेत सामाजिक उपक्रम महावितरण कंपनीत काम करणार्या अधिकारी श्री गाडे व कामगार बांधवांच्या मनी आला व लगबग सुरू झाली..की..यंदाची दिवाळी म्हणजे गेल्या दिड एक वर्षापासुन कोरोना रोगाने घातलेला हा हा कार शमवुन पुढील आयुष्य पुर्वापार चालत आलेल्या उत्सहानेच साजरी करणे..
आपल्या कुटुंबा सोबतच गोरगरीब पालावर( झोपडपट्टीत) राहणार्या लोकांमध्ये जाऊन साजरी करणे..गेल्या दिड वर्षात तोंडावर लागलेले सेफ्टी मास्क कांही क्षण बाजुला सारून त्याच धीर गंभीर आसुसलेल्या चेहऱ्यावर हर्शआनंद व हसु फुलवुन त्यांना सांगावे की तुम्ही देखील कोणी परके नसुन या समाजाचाच व मानव जातीचाच एक घटक आहात..परके पणा कसला..
आणी सुरूवात झाली ती. महावितरण लातुर शहर शाखा कार्यालय क्रमांक 03 च्या टीमकडून...* लोकांना दिवाळी सणानिमित्त आपल्या घासातील घास म्हणून घरी बनवलेले पदार्थ व थंडीपासुन संरक्षण म्हणून ब्लँकेट, फटाके, महीलांना साडी..अशा निवडक वस्तु भेट म्हणून देण्याचे ठरले.
ठरल्या प्रमाणे आज दिनांक 5/11/2021 रोजी सकाळी 10:00 वा. बार्शी रोडवरील, वसवाडी उड्डाणपूला शेजारी एका पाल वस्तीवर आम्ही गेलो तीथ जमलेल्या लोकांना प्रत्येकी बोलावुन आम्ही जमवलेल्या भेट वस्तुंचे वाटप केले..इतका छान प्रसंग डोळ्यासमोर अनुभवला की शब्दात व्यक्त करणे कठीण आहे लहान थोरांपासुन ते महीलांपर्यत सर्वांनीच आनंद व्यक्त केला..आम्ही त्यांना खुलुन हसताना पाहीलं आणी आमच्या या उपक्रमच सार्थक झालं..कांही महीलांनी गाणी म्हणत तर काहींनी नाचुन आपल्या भावना व्यक्त केल्या तर बच्चे कंपनीने टाळ्या वाजवुन जल्लोष केला...खंर सांगतो भारीच वाटलं...वाटलं आपण प्रत्यकाने असंच जमेल त्या पध्दतीने गोरगरीब समाजासाठी कांही ना काही केलं तर या समाजात कोणीही मंगळावरील पाण्यासारखं दुर्लक्षित राहणार नाही...हा विस्तृत प्रसंग केवळ समाज प्रेरणे साठी सादर करून..मनोमन सर्व कर्मचारी बांधवाचे खुप खुप आभार व धन्यवाद....! अशीच समजपयोगी कार्य भविष्यातही घडत राहो हीच सदिच्छा...!
श्री गाडे साहेब
लातूर शहर शाखा क्र३
*महावितरण*
🪔🪔हॅप्पी दिपावली 🪔🪔