सव्वा कोटीच्या गुटखा जप्त प्रकरणात...
गुटखा "किंग" फरार....!
पोलिसांकडून शोध सुरू, पथके तयार..
लातूर- शहरातील गंजगोलाई परिसरातील एका एजन्सीवर केलेल्या कारवाईमध्ये ११ लाखाचा गुटखा पकडला होता त्यानंतर रविवारी याच दुकानच्या मालकाच्या सहा गोदामावर धाडी टाकून तब्बल एक कोटी 24 लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती देण्यात आली ,तेव्हापासून गुटका किंग व त्यांचे सहकारी फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती मिळाली . लातूरच नव्हे तर जिल्हाभरात त्यांचे नेटवर्क असून गल्लीबोळात बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचे काम ते करत होते हे एवढे निर्ढावलेले असून कोणत्याही अधिकाऱ्यांना खिशात घालण्याची भाषा करत असल्याची जोरदार चर्चा सध्या लातूर शहरांमध्ये होती.परंतू पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व सा पोलीस अधीक्षक नितीन कदम यांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२०१४ पासून नेमका कसा करायचे हा धंदा..!
२०१४ पासून या गुटखा किंग चे कार्य चालत होते पाच ते सहा व्यापारी मिळून हे धंदा करायचे परंतु काही कारणास्तव यामधील काही व्हाईट कॉलर व्यापाऱ्यांनी आपले अंग काढून घेऊन कर्नाटकातून आपले वास्तव्य ठेवल्याची माहिती मिळत आहे. २०१६-१८ या वर्षी "सावकार" पूर्णपणे सक्रिय झाला महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरून राज्याची सीमा भेदून हा गुटखा निलंगा उदगीर अहमदपूर औसा मार्गे लातूर येथे काही दुकानांना वितरित केला जात होता त्यानंतर या सर्वांनी आपले साम्राज्य लातूरमध्ये छुप्या पद्धतीने वाढवले त्याचा प्ररिणाम शहरातील छोट्या पान टपरीवर उघडपणे गुटखाविक्री केला जाऊ लागला. अन्न औषध प्रशासनाकडून या सर्व गोष्टीकडे कानाडोळा केला जावू लागला मात्र पोलीस प्रशासनामध्ये धाडसी अधिकारी नसल्यामुळे त्याचा त्याचा फायदा हे गुटका किंग आपले साम्राज्य चालवत होते अधीक्षक निखिल पिंगळे व त्यांच्या टीमने केलेल्या धाडसी कारवाईने संपूर्ण लातूर शहरच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे. आता पकडलेला गुटखा तात्काळ नष्ट करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.