लातूर जिल्ह्यात गुटखा विक्रीमध्ये थैमान घालणारा प्रेम,सावकार अडकला जाळयात...!
01 कोटी 25 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.*
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची अवैध धंद्यावर कारवाई. 01 कोटी 25 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.*
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे,अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित केले होते .सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम ,उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांनी वरिष्ठांचे आदेशान्वये विविध पथके तयार करून लातूर शहरातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात राबवित आहेत. अवैध धंद्याची माहिती काढत असताना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की,लातूर शहरातील गंजगोलाई परिसरामधील एका एजन्सी शॉप मधून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे. अशी खात्रीशीर बातमी सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री.निकेतन कदम यांना व त्यांचे पथकाला मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची साठवणूक करून विक्री करणारे गंजगोलाई येथे प्रेम एजन्सी नाव असलेल्या दुकानावर व त्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या लातूर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या त्याचे गोडाऊन वर सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री.निकेतन कदम यांनी, त्यांच्या पथकाने व स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिसांनी धाडी मारल्या.
सदर धाडीमध्ये जवळपास 1 कोटी 25 लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखू मिळून आली. सदरच्या गोडाऊन मधील प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे गांधी चौक येथे प्रतिबंधित गुटका व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व्यवसाय करणारे प्रेम एजन्सी चे मालक
1)प्रेमनाथ तुकाराम मोरे व त्याचे सहकारी
2) शिवाजी मोहिते
3) सावकार
यांच्यावर तंबाखूजन्य विक्री प्रतिबंध कायद्यान्वये व भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असून
गुन्हा घडल्यापासून सदरचे आरोपी हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक श्री.माकोडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री.निकेतन कदम यांनी व त्यांच्या विशेष पथकातील पोलीस अंमलदार पायजी पुट्टेवाड, सूर्यकांत कलमे, भागवत मामाडगे ,बापू तीगीले चंद्रकांत राजमाले, साहेबराव हाके, रायभोळे, ज्ञानेश्वर जमादार यांनी केली आहे.