Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन युवकांना लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 02 गुन्हे दाखल.दोन तलवारी जप्त

हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन युवकांना लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 02 गुन्हे दाखल.दोन तलवारी जप्त




              या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.

            त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात विविध पथके तयार करुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बाभळगाव नाका,रिंग रोड परिसरात एक युवक दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळाली त्यावरून सदर पथकाने  बाभळगाव नाका  रिंग रोड परिसरातील कॉम्प्लेक्स समोरून सदर युवकास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्या युवकाकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. त्यावरून

1) अझर अहमद शेख, वय 19 वर्ष, राहणार अंजली नगर लातूर.

याचे विरोधात पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 651/2021 कलम.4,5, शस्त्र अधिनियम कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अझर अहमद शेख, यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार कोकणे हे करीत आहेत.

          तसेच आणखीन एका गोपनीय माहितीच्या आधारे आदर्श कॉलनी ते मंत्रीनगर जाणारे रोड वरील ग्रीनबेल्ट चे परिसरातून दहशत पसरविण्याच्या/गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोखंडी तलवार कब्जात बाळगलेला इसम नामे

1) यशोधन उर्फ यश केशवराव कातळे, वय 19 वर्ष, राहणार अष्टविनायक लातूर.

यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरोधात पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक.383/2021 कलम 4,5, शस्त्र अधिनियम, कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात यशोधन उर्फ एस केशवराव कातळे यास अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार चौगुले हे करीत आहेत.

             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि राहुल बहुरे पोलीस अमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के , नाना भोंग, नितीन कठारे, जमीर शेख, चालक अमलदार नकुल पाटील यांचा सहभाग होता.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post