सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे केली जाते लाईट कट आसमानी संकटा सोबत सुलतानी संकटाचा सामना...
-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थिती ने नुकसान झाले असून त्यातच सरकार शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे लाईट कनेक्शन तोडून अन्याय करत आहे. आधी कोरोना आता अतिवृष्टी व पूरस्थिती आणि त्यासोबत लाईट बंद त्यामुळे आसमानी संकटा सोबत सुलतानी संकटाचा सामना शेतकरी व सर्वसामान्यांना करावा लागत असल्याचा सरकार वर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी लातूर येथे पत्रकार परिषदेमध्ये केला.
अतिवृष्टी व पुरामुळे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानीची रविवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पाहणी केली.त्यादरम्यान काही शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या, त्यांना अश्रू अनावर झाले, आधीच पिकांचे नुकसान, त्यात वीज कनेक्शन कट केली जाते आपल्या पोटापाण्याचे आणि आपल्या लहान मुलांचे शिक्षण अंधारात असल्याचे ते म्हणाले त्यावर धीर सोडू नका, मी तुमच्या पाठीशी आहे! भरीव मदत मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी दौऱ्यादरम्यान केली असल्याचे ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे व धरणांच्या सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावासह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे फक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिले कट करत फिरुन त्यांच्या लहान मुलांना अंधारात ठेवून शिक्षणांपासुन वंचित राहावे लागत आहे,अशा अधिकार्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली.त्यावर असमानी संकटा सोबत सुलतानी संकटाचा सामना सध्या शेतकरी व सर्वसामान्य जनता करत आहे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
