विनापरवाना बांधलेल्या ३४ दुकानांना ठोकले सील ! मनपाची धडक कारवाई
लातूर/प्रतिनिधी:अंबाजोगाई रस्त्यावर विनापरवाना बांधकाम केलेल्या ३४ दुकानांना महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी ( दि.६ ऑक्टोबर)सील ठोकले.अंबाजोगाई रस्त्यावर शब्बीर टाके यांनी महानगरपालिकेचा परवाना न घेता ३४ दुकानांचे बांधकाम केले होते.ही बाब लक्षात आल्यानंतर बांधकामे नियमित करून घेण्यासाठी मनपाकडून टाके यांना नोटीस बजावण्यात आली होती.परंतु या नोटीसकडे त्यांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे बुधवारी मनपाच्या ए व डी झोनच्या संयुक्त पथकाने या दुकानांना सील ठोकले.या कारवाईत डी झोनचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे,ए झोनचे अभियंता गणेश देवणीकर,प्रेमनाथ घंटे, तहेमद शेख,किशोर पवार, रवी कांबळे,अमजद शेख, हिरा कांबळे,पद्माकर गायकवाड, तय्यबअली शेख, आर.बी.बनसोडे, अमित लामतुरे,एस.टी.नागराळे,गोविंद रोंगे,संतोष कुरकुट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.