जुना औसा रोड परिसरात नविन पोलिस चौकी चे उदघाटन श्री सुनील पुजारी यांच्या हस्ते झाले
लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवाजी नगर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री सुनील पुजारी यांच्या सहकार्याने जुना औसा रोड परिसरात लगसकर बिल्डिंग जवळ शनिवार दि 11सप्टेंबर रोजी पोलीस चौकीचे उदघाटन शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक सुनिल पुजारी यांनी केले.त्याठिकानी पोलिस चौकी झाल्यामुळे घडणार्या अवैध घटना थांबतील याबाबत तेथील नागरिकांनी विशेष कौतुक केले.
त्या वेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक संतोष औंढकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती मेतलवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब मस्के, जगन्नाथ हाडबे, विश्वनाथ गिरी, मंगेश डोंगरे, तुकाराम माने, रमेश कांबळे तर जुना औसा रोड भागातील रहिवासी माने, जाधव, महादेव पोलदासे आदिंची उपस्थिती होती.






