Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री चे विसर्जन करीत असताना लातूरकरांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन..

श्री चे विसर्जन करीत असताना लातूरकरांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन..


 



            उदगीर येथे 7 दिवसाचे श्री चे विसर्जन 16/09/ 2021 रोजी व लातूर येथील 10 दिवसाचे श्री चे विसर्जन 19/09/2021 रोजी होणार असून गणेश विसर्जनाचे अनुषंगाने covid-19 ची सध्याची परिस्थिती पाहता. मा.जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रामध्ये महानगर पालिकाआयुक्त साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या बैठकीमध्ये मध्ये 

 प्रशासनाने खालील आवाहन केलेले आहे.

👉 नागरिकांनी सार्वजनिक पणे स्थापना केलेल्या गणेश विसर्जनासाठी 4 पेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये.

👉 घरगुती गणेश विसर्जन करिता फक्त 2 लोकांनीच विसर्जनाच्या ठिकाणी जावे किंवा घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करावे.

👉 कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी नाही.

👉 उदगीर किंवा लातूरमध्ये गणेश विसर्जन करीत असताना नगरपालिका ,महानगरपालिका यांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच गणेश विसर्जन करावे.

👉गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशा प्रकारे गणेश विसर्जन करावे.

 👉 महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या संकलन केंद्रावर गणेश मुर्ती दान करून गणेश विसर्जन करावे. किंवा ज्या कारागिराने मूर्ती बनविलेली आहे त्यांच्याकडेच मूर्ती सुपूर्द करावी. 


👉 कोणतीही परिस्थितीत थेट पाण्यामध्ये विसर्जन करू नये. संकलन केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांना मूर्ती देण्यात यावी. 


👉तसेच पर्यावरणाचा व covid-19 च्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 👉 ग्रामीण भागामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

              असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post