माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
311 लोकांची नेत्र तपासणी यात 114 लोकांना चष्मा तर 83 लोकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न
शिबिरात करण्यात आलेल्या तपासणीत 83 लोकांना मोतीबिंदू निष्पन्न झाला झाला असून या सर्व रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर शिबिरातील 197 लोकांना माझं लातूर च्या वतीने मोफत चष्मा वितरण करण्यात येणार आहे.
लातूर दि 5
माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा पाऊस चालू असतानाही प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन साई फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर उदय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माझं लातूर परिवारने गत दोन वर्षापासून लातूर शहरात विविध जन हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत, याचाच एक भाग म्हणून आज शिवछत्रपती ग्रंथालय,लातूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माझं लातूर सदस्यांकडून तपासणी पूर्व नोंदणी करण्यात आली होती. यात 550 रुग्णांनी नोंदणी केली होती. तरीही या नेत्र तपासणी शिबिराला आयत्यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे अनेकांची नेत्र तपासणी मोफत करण्यात आली. नंबर असलेल्या रुग्णांना मोफत चष्मा वितरण करण्याचे नियोजन माझं लातूरच्या वतीने करण्यात आले असून मोतीबिंदूच्या रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, अभय मिरजकर, प्रमोद गुडे, दिपरत्न निलंगेकर, ऍड. प्रदीप मोरे, डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, ,तम्मा पावले, काशिनाथअप्पा बळवंते, राहुल मातोळकर, राजेश तांदळे, गोपाळ झंवर, मोहम्मद जफर, युवराज कांबळे, रत्नाकर निलंगेकर, विनोद कांबळे, आशा आयाचीत, सचिन अंकुलगे, सुनील गवळी, श्रीराम जाधव,उमेश कांबळे, शोभा कोंडेकर, मासूम खान, किशोर जैन, इम्रान नाईकवाडे आदींनी पुढाकार घेतला होता.







