राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.14(जिमाका):- राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6.30 वा. लातूर रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह लातूर कडे प्रयाण.सकाळी 6.45 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-कृषि महाविद्यालय, लातूर. दुपारी 2 ते 2.30 राखीव.
दुपारी 3.00 वा. क्षेत्रीय पाहणी सायं.7.00 वा.शासकीय विश्रामगृह लातूर येथे राखीव. रात्री 10 वा.शासकीय विश्रामगृह लातूर येथून शसकीय मोटारीने लातूर रोड रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्री 10.30 वा. लातूर रोड रेल्वे स्थानक येथून लातूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.