दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त
------------------------------ --------------------------
पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित अस्थिरोग
शिबिरात १८१ रुग्णांची मोफत तपासणी
------------------------------ ------------
विविध हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी पार पडली
------------------------------ ----------------------
लातूर ,दि. १४ : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १२६ वे मोफत शिबीर होते, हे विशेष.
दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे सर्वच डॉक्टरांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या पश्चातही सर्व डॉक्टर मंडळींच्यावतीने त्यांना अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यात येते. या आरोग्य शिबिराचा महायज्ञाचं १४ ऑगस्टला असतो. डॉ. अशोक पोद्दार हे नेहमीच ह्या शिबिरांचे मुख्य आधारस्तंभ राहिले आहेत व भविष्यातही राहतील. मागच्या वर्षी कोरोनामुळे हा उपक्रम झाला नव्हता. यावर्षी कोरोनाचे नियम पाळून आयएमए, निमा, हीमा आणि दंत वैद्यकीय डॉक्टरांनी या उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे.
लातूर येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलमध्येच नव्हे तर त्यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळे जिल्ह्यातील तब्बल १९० हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या १२६ व्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, युवा नेते अभिजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर कैलास कांबळे, प्रसाद उदगीरकर, राजकुमार मिणियार , सचिन भराडिया, सुबोध सोमाणी, जितेश बजाज, जयेश बजाज, शाम धूत, दीपक वारद , संजय भार्गव, विजय रांदड, विजय पस्तापुरे यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अशा प्रकारचा आरोग्य शिबीर राबविण्याच्या डॉ. अशोक पोद्दार यांना आयएमए अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. किणीकर, डॉ. भराटे ,डॉ. बरमदे यांनी मोलाची साथ दिली आहे.या शिबिराच्या माध्यमातून सर्व हॉस्पिटलच्या मदशयमातून हजारो रुग्णाची तपासणी, उपचार करण्यात आले.
डॉ .पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना हिंमतराव जाधव यांनी पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य क्षेत्रात अतिशय उल्लेखनिय कार्य केले जाते हे सर्वज्ञात आहे. लोकोपयोगी उपक्रम राबविण्याकामी डॉ. अशोक पोद्दार सतत प्रयत्नशील असतात. आजही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ९ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांनी रुग्णसेवेचा आपला हा उपक्रम कायम ठेवला आहे, ही बाब अतिशय अभिनंदनीय आहे. अभिजित देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रतिवर्षी पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविला जात असून त्याचा रुग्णांना चांगलाच फायदा होतो असे सांगितले. मागच्या वर्षी कोरोनाच्या कारणामुळे अशा प्रकारचे शिबीर घेता आले नव्हते. पण यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा अवलंब करून हे यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हटले जाते. पण, दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख हे मानवसेवा हीच ईश्वरसेवा असे मानत असत. त्याप्रमाणे डॉ. पोद्दार व त्यांचे सहकारी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. अशोक पोद्दार यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रतिवर्षी आपल्या हॉस्पिटलमध्ये लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी आरोग्य शिबीर घेण्यात येते असे सांगितले. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून केवळ आपल्याच हॉस्पिटलमध्ये नव्हे तर जिल्ह्यातील एकूण १९० हॉस्पिटलमध्ये असा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशा आशयाची एक म्हण एलआयसी कडून प्रचलित आहे. ती म्हण स्व. विलासराव देशमुख यांना चपखल लागू पडते, असेही डॉ. पोद्दार म्हणाले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांना देण्यात आलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लोकनेत्याप् रती आदर व्यक्त करणारी भूला ना पायेंगे अशा आशयाची ओळ रेखाटण्यात आली होती. तसेच विलासराव देशमुख यांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफितीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. या शिबिरात एकूण १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ रुग्णांचे एक्सरे, १२८ रुग्णांची हाडांच्या ठिसूळपणाची बीएमडी तपासणी, २३ रुग्णांच्या रक्ताची तपासणी तर ७७ रुग्णांची फिजिओथेरपी करण्यात आली. रुग्णांच्या तपासनीस डॉ. अशोक पोद्दार यांना डॉ. इमरान कुरेशी, डॉ. प्रशांत अंबुरे, डॉ. भोसगे , डॉ. स्मिता खानापुरे, डॉ. धन्यकुमार तोडकरी, डॉ. अंगिराज शेरे , डॉ. पल्लवी जाधव, डॉ. प्रतीक्षा, डॉ. मयुरी, डॉ. रेणुका पंडगे यांनी सहाय्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसूलखान पठाण यांनी तर आभार प्रदर्शन वसीम शेख यांनी केले.
