लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मार्च
१५ ऑगस्ट २०२१ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. देशाच्या स्वतंत्रता लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या पक्षाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.ना. अमितजी देशमुख साहेब व लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननिय धीरजजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट २०२१ पासून १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत विविध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा ह्या उद्देशाने "व्यर्थ न हो बलिदान" हे अभियान सुरू करण्यात येत आहे
याच अभियानाचा भाग म्हणून आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता मशाल मार्चचे आयोजन केले होते. ही पदयात्रा आदर्श कॉलनी लातूर येथून निघून हुतात्मा स्मारक जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे शहीद स्मारकाला अभिवादन करून संपली.. याप्रसंगी भारत माता की जय या घोषणेने औसा रोड परिसर दणाणून निघाला.


