ना. अमित विलासराव देशमुख यांची पीव्हीआर चौकप रिसरातील वुडटूल्स कंपनीला भेट
लातूर प्रतिनिधी (शनिवार दि. १४ ऑगस्ट २१)
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज पीव्हीआर चौक परिसरातील चैतन्य चापसी यांच्या वुडटूल्स कंपनीला भेट दिली. कंपनीची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या कंपनीत तयार करण्यात येत असलेल्या उत्पादनाची माहिती जाणून घेतली पेपर, लाकूड, टायर ॲल्युमिनियम कापण्यासाठी कटिंग ब्लेड कशा तयार होतात ते पाहिले टीसिटी प्लांट, पिलिंग नाईट प्लांट, सेटिंग ब्लेड प्लांट यांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उद्योजक चैतन्य चापसी, महापौर विक्रांत गोजमगुंडे, सभापती ललितकुमार शहा, डॉ. अशोक पोद्दार, कुमार चापसी, परीमल चापसी, केयूर कामदार, रीतेश चापसी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. अमिल देशमुख म्हणाले की, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची लोकेश चापसी यांनी भेट घेऊन त्यांनी हा उद्योग सुरू करण्यासाठी जागा मागितली तर त्यांनी लातुरात हा उद्योग सुरू करावा असे सांगितले. त्यामुळे हा उद्योग लातुरात सुरू आहे. या उद्योगाचे उत्पादन कटींग ब्लेड जपानला निर्यात केले जातात. आता जगात आठ लोक या आशा वस्तूचे उत्पादन करतात यात एक चापसी कुटूंब आहे. मेडिकलसाठी लागणारी सुई तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. हा उद्योग कमी पाण्यावर चालतो अशाच उद्योगाची लातूरला गरज आहे असेही ते म्हणाले.







