बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी भातांगळी येथील एकाला अटक
लातूर/प्रतिनिधि
विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी लातूर तालुक्यातील भातांगळी येथील एका विरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे
मिळालेल्या महिती नुसार भातांगळी येथील प्रकाश रामकिशन बेंबडे यांच्याकडे बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे उल्लंघन करताना मोटर सायकल वरती मिळाले, त्यावरून पोलिसांनी त्याच्या जवळील पिस्टल किंमत दहा हजार रुपये जिवंत काडतूस, रंगाची मॅक्झिन असा एकूण चाळीस हजाराचे साहित्य जप्त केले पोलीस उपनिरीक्षक तानाजी चोरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश रामकिशन बेंबडे यांच्या विरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा व 135 मोपका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
