लातूर शहरात प्लास्टीक पिशव्यांनी घेतला एका गाईचा जीव !
फोटो क्राईम न्यूज प्रतिनिधिनी सामाजिक बांधिलकी जपत केला गाईचाअंत्यसंस्कार
लातूर-
लातूर शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत आहे.शहरात जागोजागी कचर्यांचे ढिग साचले आहेत.त्याकडे प्रशाशनाचे दुर्ल़क्ष होताना दिसत आहे.घंटागाडी तर नावालाच असुन नगरसेवक ही मुग गिळुन गप्प आहेत.त्याचाच परिणाम म्हणुन कचर्यामध्ये साचलेल्या प्लास्टीक पिशव्या खावून एका गाईचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना शनिवार दि 28ऑगस्ट रोजी औसा रोडवरील चाकुरकर यांच्या घरासमोर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारदि.28/08/2021 रोजी सायंकाळी ६.२३ च्या सचमारास फोटो क्राईम न्यूज प्रतिनिधि धनंजय मुंडे यांना Adv. अजितदादा चिखलीकर यांचा कॉल आला की शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरासमोर एक गाय अतिशय गंभीर अवस्थेत नालीत पडली आहे, हे ऐकताच लगेच तेथे गेलो तोपर्यंत माझ्या तीन/चार मित्रांनी मिळून त्या गाईला नालीतून बाहेर काढले होते. त्या गाईकडे बघितल्यावर ती गाय डोळे पांढरे करून मोठ्याने श्वास घेत तडफडत होती मी लगेच जाऊन डॉक्टरांना त्या ठिकाणी घेऊन आलो व औषधउपचार चालू केले १.३० तास त्या गाईवर औषधउपचार केले व तिला एका झाडाखाली सरकाऊन ठेवले व पांघरून टाकून पाऊस लागूनये म्हणून पोते टाकले व डॉक्टर वापस निघाले असता त्यांच्या लक्षात आले की ह्या गाईने जीव सोडला आहे, या गाईचा मृत्यू फूड पॉईझनिंग ने झाला व तिच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॅग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व त्या मुळेच त्या गाईचा जीव गेला असे डॉक्टर म्हणाले.त्यांमुळे ती गाय मृत झाल्याचे सांगितले.त्यानंतर उपमहापौर मा.चंद्रकांत बिराजदार यांना कॉल केला व सदरील घटना त्यांना सांगितली व त्याचा अंत्यविधी करायचा आहे असे सांगताच त्यांनी लगेच घंटागाडी सुपरवायझर कसबे, फायरब्रिगेड ची टीम व सोबत एक jcb पाठवली त्या गाईच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून दिली.फोटो क्राईम न्यूज प्रतिनिधि नी पुढाकार घेवून पारंपारिक विधी प्रमाणे त्या गाईचा अंत्यविधी केला. या पूर्ण कार्यात फोटो क्राईम न्यूज प्रतिनिधि महादेव पोलदासे, धनंजय मुंडे, वेदांत कुलकर्णी,प्रवीण कुंभार,प्रसाद कोळी,अक्षय कदम सहाय्यक डॉक्टर, सय्यद पटेल सहाय्यक डॉक्टर, अशितोष बाजपाई, ज्ञानेश्वर कदम,सौदागर बिराजदार,किशोर कसबे घंटागाडी सुपरवायझर, फायरब्रिगेड ची पूर्ण टीम】हे सर्व उपस्थित होते.त्यांचे संपुर्ण लातूर शहरात विशेष कौतुक होत आहे
प्रशाशनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देवून सर्व कचरा हटावन्याचे काम करावे
असे कोठेही घडत असल्यास संपर्क करावा-फोटो क्राईम न्यूज चे आवाहान
कृपया कोणीही गाईला नेवैद्य व आणखीन काही खाईला टाकत असताना प्लास्टिक बॅग सोबत ठेवुनये व प्लास्टिक बॅग मध्ये खाईला देऊनये कारण ते प्लास्टिक खातात व त्या मुळे आशा कित्येक गाईंचा जीव दिवसेंदिवस जात आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी. असे काही घडल्यास आम्हाला नक्की संपर्क साधा.9011100037,9975471087,7038211053, 7083133992)














