महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे महागाईच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे महागाईच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध घोषणाबाजी करण्यात आली पेट्रोल डिझेल गॅस व गोडतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या विषयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वात आज सकाळी साडेअकरा वाजता आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष मनोज अभंगे, विद्यार्थी सेनेचे किरण चव्हाण, एडवोकेट अजय कलशेट्टी, बालाजी पाटील, अंकुश शिंदे, प्रीती भगत, जहांगीर शेख, परमेश्वर पवार इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते